दैनिक हिंदू प्रकाश वार्ता (Santosh Karpe)
छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी राज्य शासनाने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ओबीसी विद्यार्थ्याप्रमाणे प्रवेश शुल्क व इतर शैक्षणिक सवलती लागू केल्या आहेत त्याविषयीचा शासन निर्णय जाहीर केला आहे मात्र या निर्णयाची अंमलबजावणी अनेक महाविद्यालय करीत नाही त्यामुळे विद्यापीठ आणि उच्च शिक्षण विभागाने या निर्णयाचा अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्याची मागणी करणारे निवेदन बामुक्टा संघटनेतर्फे विद्यापीठ व विभागीय सहसंचालकांना दिले आहे निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष डॉ.राजेश करपे, सचिव डॉ.प्रशांत कुमार वेनेज ,आदिसक्षा सदस्य प्रा. हरिदास सोमवंशी आधीच्या स्वाक्षऱ्या आहेत.