बिडकीन प्रतिनिधी, पैठण तालुक्यातील बिडकीन येथील सेठ मोतीलाल तोतला शैक्षणिक संस्था संचालित ब्लू व्हॅली इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशीचा पवित्र उत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. भारतीय संस्कृती, संतपरंपरा आणि वारकरी संप्रदायाचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे, तसेच त्यांच्यामध्ये आध्यात्मिक व सांस्कृतिक मूल्यांची जपणूक व्हावी, या उद्देशाने विविध