जिंतूर, दि. १ (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे शिल्पकार व हरितक्रांतीचे जनक स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिंतूर दिवाणी न्यायालयात अभिवादन कार्यक्रम झाला. मा. न्यायाधीश तळणीकर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. स्व. नाईक यांच्या कृषी, शिक्षण, ग्रामीण विकास, रोजगार हमी योजना व श्वेतक्रांतीतील योगदानाचा आढावा घेत, त्यांचे विचार आजही विकासाचा मार्ग दाखवणारे असल्याचे सांगितले. अँड. विजयराव देशमुख यांनीही त्यांच्या कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड. गजानन नागरे यांनी केले. यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ, वकील संघाचे पदाधिकारी, न्यायालयीन अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.