header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 13 संचालकाची बिनविरोध निवड.

 बोर्डीकर वरपूडकर गोरेगावकर गुट्टे विटेकरांचा मार्ग सुकर तर आमदार नवघरे निवडणूक लढवावी लागणार.

 परभणी: सर्व जिल्ह्यांमध्ये मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या गाजावाजा होत असतानाच अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी गर्दीच उसळलीहोती त्यातून केवळ 13 जागावर बिनविरोध निवड झाली 

 अर्ज माघारीच्या याद्या बनवायला त्यामुळेच विलंब झाला की न्यायालयीन प्रक्रियेच्या धसक्याने हे कळायला मार्ग नाही उमेदवाराच्या अंतिम यादी सह दिनांक दहा रोजी चिन्ह वाटप होणारा आठ जागांसाठी 19 जुलैला मतदान होणार आहे 

 अधिक माहिती अशी की परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी तालुका निहाय सोसायटी मतदारसंघ हिंगोली जिल्ह्यातून औंढा तालुक्यातील राजेश गोरेगावकर व दिग्विजय गोरेगावकर हे पिता पुत्र बिनविरोध निवडून आले आहेत वय वर्ष 24 यांनी बिनविरोध निवडून येऊन कमी वयाच्या संचालक पदाचा मान मिळवला आहे तर परभणीतून माजी आमदार सुरेश वरपूडकर तर जिंतूर मधून माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर सेलू मधून पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर सोनपेठ मधून आ.राजेश विटेकर गंगाखेड मधून आ. रत्नाकर गुट्टे. पालम मधून तुषार दुधाटे पठाण मेराजखान शेर गुल खान संचालक पदावर बिनविरोध निवडझाली आहे. या मतदारसंघांमध्ये हा अद्भुत चमत्कार घडला आहे यातील पालम मतदारसंघात एकमेव उमेदवार असल्याने व औंढा गंगाखेड मध्ये छाननी उमेदवार बाद झाल्याने कुठलाही अडथळा राहिला नव्हता.

 कृषी पणन प्रक्रिया मतदार संघात माजी आमदार सुरेश देशमुख यांनी बाजी मारली असून चौघांनी माघार घेतली असून महिला राखीव जागेवर भावना बोर्डीकर व प्रेरणा वरपूडकर या दोन्ही महिला संचालिकांनी बिनविरोध बाजी मारली यामध्ये तब्बल 17 जण आणि माघार घेतली मागास प्रवर्गातून एका जागेसाठी भगवान वाघमारे यांचा एकच अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली ही निवड त्यांची दुसऱ्यांदा झाली आहे या ठिकाणी तब्बल आठ जण आणि माघार घेतली असून न्यायालयीन लढाई आलेल्या एका उमेदवाराने माघार घेतली आहे आठ जागांसाठीच ही निवडणूक प्रक्रिया राबविण्याची वेळ न्यायालयीन प्रकरणी संपली की आणखी कुणाची बाकी आहेत हेही अजून गुलदस्त्यातच आहे. सेवा सोसायटीच्या दोन जिल्ह्यातील पाच मतदारसंघात लढत होणार असून रमेश शिंदे तर वसमत मधून आमदार चंद्रकांत नवघरे व तुषार जाधव न्यायालयीन लढा देऊन रिंगणात आले आहेत मानवत मधून आकाश चौकट व अमोल कदम तर पूर्णा येथून नंदकुमार डाखोरे व तुळशीराम बोबडे यांच्यात सरळ सरळ लढत आहे.

 इतर शेती मतदारसंघात 17 उमेदवारांच्या माघारी नंतर आ. सईद खान ,विजय जामकर,विजय मोरे सय्यद हरसान व प्रीती जाधव असे पाच उमेदवार रिंगणात उरले आहेत अशीच अवस्था अनुसूचित जाती जमाती मतदारसंघाचे असून प्रशास ठाकूर  अतुल सरोदे संजय सारणीकर रिंगणात असून चार जणांनी माघार घेतली आहे विमुक्त जाती व भटक्या जमाती विमुक्त मागास प्रभाग मतदारसंघातही 11 जणांच्या माघारी नंतर स्वराज सिंह परिहार, अभय कुंडगीर, सुनंदा फलके दत्तात्रय मांयदळे, बळीराम सोरेकर हे पाच उमेदवार रिंगणात आहेत

   सर्वांचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत सर्वांचे आकर्षण व कमी वयामध्ये संचालक होण्याचा बहुमान राज्यात तर आहेच देशातही अवघ्या 24 वर्षांचा संचालक म्हणून विद्यमान उपाध्यक्ष राजेश गोरेगावकर यांचे चिरंजीव दिग्विजय गोरेगावकर  यांनी पटकाविला आहे.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90