गॅस सिलेंडरच्या 14 टाक्या व पिकअप वाहन जप्त. पाथरी पोलिसात गुन्हा दाखल.
हिंदू प्रकाश वार्ता प्रतिनिधी.
परभणी: सेलू तालुक्यातील खवणे पिंपरी येथील इंडियन गॅस एजन्सी चे गोडाऊन फोडून गॅस सिलेंडरच्या टाक्याची चोरी झाल्याची घटना 26 मार्च रोजी घडली होती या प्रकरणाचा पाथरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरील या गुन्ह्याची उकल शुक्रवार 10 जुलै रोजी तपास करून उघडकीस आला आणि गुन्हे शाखा व पाथरी पोलीस स्टेशन यांच्याकडून तपास चालू करण्यात आला. त्या तपासात एक आरोपीस मुद्देमाला सहितताब्यात घेण्यात आले.
अधिक माहिती अशी की पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे रेकॉर्डवरील आरोपी राजेश पवार गणेश काळे राहणार इंदिरानगर पाथरी व गौतम भगवान आदमाने राहणार सारोळा तालुका पाथरी या तिघांना ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याबाबतची सखोल चौकशी केली असता कबुली दिली यावरून आरोपी राजेश पवार यांच्या घरून चोरी केलेल्या गॅस सिलेंडरच्या 14 टाक्या एका कंपनीच्या पिकप वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला राजेश पवार यांच्याकडे पात्री गॅस एजन्सी चे काम असून त्याने यापूर्वी घनसावंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून कुंभारी पिंपळगाव येथून देखील गॅस सिलेंडरच्या जवळपास 60 टाक्या चोरल्याची माहिती तपासात उघड झाली आहे यांच्या आदेशावरून अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे स्थानिक गुना शाखेचे संपूर्ण अशोक जायभाय सपुनि नरके पोलीस अंमलदार विलास सातपुते रंगनाथ दुधाटे विष्णू चव्हाण मधुकर ढवळे हनुमान ढगे उत्तम हनुमंते घुगे बालाजी रेडी गणेश कवटकर यांच्या पथकाने ही कार्यवाही यशस्वीरित्या पूर्ण केली.