हिंदू प्रकाशवार्ता/ प्रतिनिधी
सोयगाव,दि.१९ जुलै
धार्मिक,सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर मातृ-पितृभक्त लक्ष्मी अलंकार सोयगाव-शेंदुर्णी चे मालक विष्णू गोविंदराव दुसाने व गोपाल गोविंदराव दुसाने यांनी आपल्या आईला सोबत घेऊन चार धाम यात्रा यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल समाज प्रबोधनकार विष्णू मापारी सोयगावकर यांचे निवासस्थानी दि.१९ रविवार रोजी प्रथमतः मातोश्री सुमनबाई गोविंदराव दुसाने यांचा नलिनीताई जामदार, सिता मापारी यांच्या हस्ते पुष्पहार,खन,नारळ देऊन सत्कार करण्यात आला.त्यानंतर विष्णू दुसाने व गोपाल दुसाने, मनिषा दुसाने सह संगीता दुसाने यांचा समाज प्रबोधनकार विष्णू मापारी यांनी शाल श्रीफळ,स्मृतीचिन्ह देऊन यथोचित सत्कार केला व दुसाने बंधू करीत असलेल्या सत्कार्याचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले.यावेळी जगदाळे सर,आरोग्य दूत दिगंबर वाघ,भगवान वाघ यांचे सह मापारी परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.