दैनिक हिंदू प्रकाश वार्ता
सतोष करपे
छत्रपती संभाजी नगर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गंगापूर खुलताबाद तालुक्यातील विविध विकास कामाचे भूमिपूजन होणार असून यात खुलताबाद तालुक्यातील पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेले मिनी महाबळेश्वर असलेल्या.व धार्मिकदृष्ट्या मराठवाड्याची कुलदैवत म्हणून गिरजा देवी. बालाजी मंदिर दर्शनासाठी या ठिकाणी भाविकांची नेहमी मोठी गर्दी असते. म्हैसमाळ खुलताबाद रस्त्याचे अनेक दिवसापासून रखडलेल्या कामा साठी ८ कोटी २३ लाख रुपये मंजूर झाल्या असून कामाचे भूमिपूजन गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते होणार आहे आ बंब यांच्या प्रयत्नातून या कामास मंजुरी मिळाली असून या कामाचा शुभारंभ बुधवार दि २२ जुलै रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे या कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश वाकळे पंचायत समितीच्या सभापती सुनिता संजय खंडागळे . तालुका अध्यक्ष प्रकाश चव्हाण जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर नलावडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे