भाजपचे अल्पसंख्याक मोर्चा प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी यांनी शिबीर आयोजन केले,
सावळदबारा परिसरात माहिती देताना भाजपचे सोयगाव तालुका सरचिटणीस गुलाबराव पाटील कोलते,
सावळदबारा परिसरात माहिती देताना भाजपचे सोयगाव तालुका सरचिटणीस गुलाबराव पाटील कोलते,
सावळदबारा प्रतिनिधी :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सोयगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २४ जुलै रोजी उपजिल्हा रुग्णालय सोयगाव येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले असून, दिव्यांगांची तपासणी करून जागेवरच प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे. तसेच नूतनीकरण, आरोग्य तपासणी आणि आयुष्मान भारत कार्ड वाटप करण्यात येणार आहे.
हे शिबिर भाजपचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी यांनी आयोजित केले आहे. दि. २० जुलै रोजी भाजपचे सोयगाव तालुका सरचिटणीस गुलाबराव पाटील कोलते यांनी सावळदबारा, नांदातांडा, घाणेगाव, मोलखेडा, महालब्धा, हिवरी, पिंपळवाडी, रवळा, जवळा, जामठी, डाभा,सावळदबारा सह परिसरातील आदी गावांना भेटी देऊन नागरिकांना शिबिराची माहिती दिली.
दिव्यांग बांधवांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपचे सोयगाव तालुका सरचिटणीस गुलाबराव पाटील कोलते यांनी केले आहे.