header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

बिडकीन येथील ब्लू व्हॅली इंग्लिश स्कूलमध्ये लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी

बिडकीन (प्रतिनिधी): पैठण तालुक्यातील बिडकीन येथील सेठ मोतीलाल तोतला शैक्षणिक संस्था संचलित ब्लू व्हॅली इंग्लिश स्कूल येथे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रणेते, थोर राष्ट्रनेते आणि समाजजागृतीचे प्रेरणास्थान लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सविता तोतला यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” हा लोकमान्य टिळकांचा प्रेरणादायी विचार आजही प्रत्येक भारतीयाला राष्ट्रप्रेम, स्वाभिमान आणि कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा देतो. त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून समाजात राष्ट्रीय एकात्मता निर्माण केली. तसेच शिक्षण, सामाजिक जागृती आणि स्वातंत्र्य चळवळीत त्यांचे योगदान अतुलनीय असून विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन प्रामाणिकपणे शिक्षण घेऊन देशाचे सुजाण नागरिक बनावे, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90