शेतकरी दोन दिवसापासून बेपत्ता होता.
सदरील घटना पूर्णा शहरातघडली.
हिंदू प्रकाश वार्ता प्रतिनिधी
परभणी:- पूर्णा शहरात लगतच्या शेतात लोंबत असलेल्या विद्युत वाहिनीचा शॉक लागून एका 45 वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला असल्याचे घटना उघडकीस आली असून मागील दोन दिवसापासून घरातून बेपत्ता असलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह 25 जुलै रोजी शनिवारी शेतातील नाल्यात आढळून आला असून याप्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची. नोंद करण्यात आली आहे
अधिक माहिती अशी की राजेश नामदेव सोनवणे वय 45 वर्षे राहणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर पूर्णा शहरालगतच्या असलेल्या शेतातील आखाड्यातील जनावरांना वैरण व पाणी देण्याकरिता ते 23 जुलै रोजी सकाळी सुमारे अकरा वाजता घरातून निघाले परंतु रात्री उशिरापर्यंत घरात परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांच्या शोध सुरू केला इतर अनेक ठिकाणी त्यांचे चौकशी केली असता ते आढळून. न आल्याने बेपत्ता झाल्याची तक्रार पुन्हा पोलिसात दाखल करण्यात आली. 25 जुलै रोजी दुपारी नातेवाईक शेतात शोध घेत असताना राजेश सोनवणे यांचा मृतदेह शेतात खोदलेल्या नाली मध्ये पडलेल्या अवस्थेत आढळून आला. फौजदार श्रीनिवास पडलवार बीट जमादार आनंद सोनकांबळे राहुल मोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत शव विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय पूर्णा येथे पाठवण्यात आले.
शव विच्छेदनानंतर त्यांचा मृत्यू विजेचा शॉक लागून झाल्याचे स्पष्ट केले. पोलिसांच्या प्राथमिक तपासणीत शेतातील लोबनाऱ्या विद्युत वाहिनीचा शॉक लागल्याने ही घटना घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून सोनवणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले भाऊ असा परिवार आहे पुढील तपास पोलीस जमादार राहुल मोरे हे करीत आहेत.