header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

जिंतूर तालुक्यातील २४६  अंगणवाड्यामध्ये विद्युत पुरवठात नसल्याने डिजिटल तंत्रज्ञानाला हरताळ

अनेक सुविधांचा अभाव

विद्युत पुरवठा नाही, पाणीपुरवठा नाही, अनेक इमारतींना गळती, अनेक इमारती धोकादायक,

 कवळ्या मनाच्या बालकावर डिजिटल ज्ञानाचे धडे कसे शिकवणार

जिंतूर  

प्रतिनिधी / सचिन रायपत्रीवार 

दि२८ तालुक्यातील महिला बालकल्याण विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या अंगणवाड्याची देखभाल, दुरुस्ती, विद्यार्थ्यांना पोषण आहार, महिलांचे आरोग्य ,विद्यार्थ्यांचे लसीकरण, बालकांचा सर्वांगीण विकास, डिजिटल तंत्रज्ञानाची ओळख, विविध खेळाचे साहित्य मनोरंजन इत्यादी सुविधा अंगणवाडी मार्फत दिल्या जातात .परंतु धक्कादायक बाब अशी की जिंतूर तालुक्यातील एकूण 316 असून 246 अंगणवाड्यांमध्ये विद्युत पुरवठा केला नसल्याने डिजिटल तंत्रज्ञानाला या अंगणवाड्यामध्ये हरताळ फसला आहे. नवीन शैक्षणिक वर्ष चालू झाले असून केवळ 6 आठवडे झाले आहेत. परंतु जून,जूलै मध्ये पडलेल्या पावसामुळे जिंतूर तालुक्यातील एकूण 77 अंगणवाड्यांना छेत  गळती चालू झाली आहे. अशी माहिती महिला व बालकल्याण विभाग जिंतूरच्या वतीने वरिष्ठ कार्यालयांना कळविण्यात आली आहे. परंतु याकडे अद्यापही दुर्लक्ष केले असल्याने सदरील कवळ्या बालकांच्या मनावर याचा दुष्परिणाम होत आहे.

जिंतूर तालुक्यातील एकूण अंगणवाडीत  अनेक समस्यांच्या विळाख्यात आहेत.

 छताचे पाणी पडत असल्याने अनेक आंगणवाड्यामधील साहित्याचे नुकसान व खराब  झाले आहेत . पोषण आहार, डिजिटल साहित्य खेळण्याचे साहित्य ,विद्यार्थ्यांना बसण्यासाठी अडचणी निर्माण झाले आहेत. ज्यांनी काम घेतली त्यांनी काम व्यवस्थित न केल्याने बोगस काम केल्यामुळेच हा प्रकार सर्व समोर आला आहे. परंतु  अंगणवाड्यांची दुरावस्था झाली आहे.   राजकीय वरदहस्त असल्याने गुत्तेदाराने मनमानी पद्धतीने व शासकीय अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने हा सर्व प्रकार दिसून येत आहे. अंगणवाड्यामध्ये विद्युत पुरवठा देण्यासाठी कोणाच्या नावाने मीटर घेण्यात यावी .सदरील मीटरचे डिपॉझिट कोणी भरावे. तसेच मासिक येणारे बिल कोणी भरावी याची लेखी स्वरूपात माहिती नसल्याने हा सर्व सावळा गोंधळ दिसून येत आहे त्यामुळेच डिजिटल तंत्रज्ञानाला जिंतूर तालुक्यातील अंगणवाड्यामध्ये हरताळ फासली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.

चौकट 

छेताला गळती लागलेल्या  अंगणवाडी

जोगी तांडा, डिग्रस १,डिग्रस २, मांडवा ,घेवडा,अंबरवाडी१,अंबरवाडी३, किन्ही, अंगलगाव तांडा ,भोसी १,भोसी २, पिंपळगाव काजळे, पिंपळगाव तांडा१, पिंपळगाव तांडा२, कुऱ्हाडी,मुरूमखेडा, यासह एकूण 77 अंगणवाड्यांची हीच अवस्था आहे.

चोकट 

अंगणवाडी धोकादायक इमारती

 केहाळ २,मांडवा, अंगलगाव, असोला ,भागूनाईक  तांडा ,जांब तांडा, पाचलेगाव२, सोनापूर २

चोकट 

अंगणवाडीत विद्युत पुरवठा जोडणी  नाहीत. 

जिंतूर तालुक्यातील एकूण 316 अंगणवाडी यापैकी 246 अंगणवाडीमध्ये विद्युत पुरवठा जोडणी अद्यापही केलेली नाही. त्यामुळे बालकांना डिजिटल माहिती पुरविण्यास अडचणी निर्माण होत आहेत. 

चोकट 

आलेले साहित्य धुळखात पडून आहे.

शासनाच्या वतीने अनेक अंगणवाड्यांना लाखो रुपयांचे साहित्य देऊन सदरील अंगणवाड्यांमध्ये विद्युत पुरवठा नसल्याने साहित्य धुळखात पडून आहे .याकडे मात्र प्रशासनाची दुर्लक्ष असून बालकांना तंत्रज्ञानापासून वंचित ठेवले जात आहे.

चोकट 

स्वच्छालय यांचा अभाव

अनेक अंगणवाड्यामध्ये स्वच्छालय मात्र नावालाच असून बालकांना त्याचा उपयोग होत नाही. पाणीपुरवठा नळ कलेक्शन नसल्याने सदरील स्वच्छालय बंद अवस्थेत आहेत. अनेक अंगणवाड्यामध्ये बालकांना स्वच्छालय उघड्यावर पाठविले जात आहेत. 

चौकट

 अंगणवाड्यात पाणीपुरवठा नाही

जिंतूर तालुक्यातील अनेक अंगणवाड्यामध्ये नळ पुरवठा नाही,बोर, हात पंप नाही व पाणीपुरवठ्याची कुठली साधन नसल्याने अंगणवाडीत परसबाग फुलविणे दुरावस्त झाले.

चोकट 

डिजिटलायझेशनचे मुख्य फायदे

डिजिटल अंगणवाडी 

काही आधुनिक अंगणवाड्यांमध्ये लहान मुलांच्या पूर्व-प्राथमिक शिक्षणासाठी (Pre-school education) स्मार्ट टीव्ही, एलईडी स्क्रीन्स आणि ऑडिओ-व्हिज्युअल (Audio-Visual) तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे, जेणेकरून मुले आवडीने शिकू शकतील.

चौकट 

जिंतूर तालुक्यातील एकूण अंगणवाडी संख्या316

1 विभाग मध्ये अंगणवाडी संख्या 142 

२ विभाग  मध्ये अंगणवाडी संख्या 174

1विभागात विधाथी संखया आदाजे 6600

२ विभागात विधाथी संख्या अंदाजे 7500

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90