छत्रपती संभाजीनगर : समर्थनगर येथील वरद गणेश मंदिरात संकष्ट चतुर्थीनिमित्त विविध फुलांपासून गाभाऱ्यात सजावट करण्यात आली होती.यात ऑर्चिड , डच गुलाब,जरबेरा, जिप्सी अशा 151 फुलांपासून गणरायांभोवती साकारलेली आरास भाविकांचे लक्ष्य वेधून घेत होती. अधिक मासातील संकष्टीनिमित्त यजमानांकडून अभिषेक,याग करण्यात आला.तसेच रोटरी ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.तसेच मंदिरात सकाळपासून दिवसभर रात्री चंद्रोदयापर्यंत भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती.यावेळेस भाविकांना 1 क्विंटल केळी,51 क्विंटल साबुदाना खिचडी,राजगिरा लाडूचा प्रसाद वाटप करण्यात आला.पंकज खोडेगावकर,गजानन जोशी,पीयूष देशपांडे यांच्या उपस्थितीत वरदविनायकाची दोन्ही वेळेस आरती करण्यात आली. संपूर्ण दिवसभर भाविकांना यथोचित दर्शन व प्रसाद व्यवस्थेसाठी श्री गणेश सभेचे अध्यक्ष सुनील खोचे,सचिव अरविंद तेलवाडकर,कोषाध्यक्ष अनिल वाळूजकर,विश्वस्त मयुरेश कोटणीस,सहसचिव अरूण जोशी,विश्वस्त निर्मला तरटे,उषा देशपांडे,निशा धामणेकर,सेवेकरी मनोहर सराफ,शरद बावसकर,अजय कोटणीस,काळेगावकर,अजय पांडे आदींनी परिश्रम घेतले.

