header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

१८ वर्षांनंतर राजा बाजार जैन मंदिरात आचार्य सिद्धांत सागरजी महाराजांचे मंगल आगमन

छत्रपती संभाजीनगर : जैन समाजासाठी अत्यंत आनंददायी आणि ऐतिहासिक क्षण ठरणारा योग तब्बल १८ वर्षांनंतर लाभला असून परम पूज्य आचार्य श्री १०८ सिद्धांत सागरजी महामुनिराज (११ पिच्छी) ससंघ यांचे राजा बाजार दिगंबर जैन मंदिरात ६ जून रोजी मंगल आगमन होत आहे. या निमित्ताने तीन दिवसीय धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

आचार्य श्री सकाळी ६ वाजता देशमुख नगर येथून मंगल विहारास प्रारंभ करणार असून मोढा नाका येथे त्यांचे स्वागत होईल. किराणा चौडी चौकात भव्य गुरु-मिलन सोहळ्यानंतर सकाळी ७.३० वाजता राजा बाजार जैन मंदिरात मंगल प्रवेश होणार आहे. यावेळी गणिनी आर्यिका श्री विमलप्रभा माताजी आणि आर्यिका श्री वीहेनश्री माताजी ससंघ यांचेही मंगल मिलन होणार आहे.

६ जून रोजी पंचामृत अभिषेक, मंगल प्रवचन आणि आहारचर्या, तर ७ जून रोजी श्री पार्श्वनाथ विधान, अभिषेक व प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे. ८ जून रोजी आचार्य श्री विनम्र सागरजी गुरुदेव यांच्या २४ व्या दीक्षा महोत्सवानिमित्त गुरु पूजन व विनयांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

भक्ती, संगीत आणि अध्यात्माच्या वातावरणात होणाऱ्या या त्रिदिवसीय महोत्सवात समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन धर्मलाभ घ्यावा, असे आवाहन पंचायत अध्यक्ष महावीर पाटणी, सचिव प्रकाश अजमेरा व विश्वस्त मंडळाने केले आहे.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90