आजपासून फक्त सायकलचाच वापर भालेराव यांना केली प्रेरणादायी सुरुवात

छत्रपती संभाजीनगर:
जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून सिटी चौक पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले सायकलप्रेमी रमेश भालेराव यांनी एक प्रेरणादायी संकल्प केला आहे.
ते शक्य तितक्या वेळा सायकलवरूनच कर्तव्य बजावणार आहेत. युद्धाजण्य परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत आणि पर्यावरण संवर्धनासाठी आपले योगदान देत ते हा खारीचा वाटा उचलणार आहेत.
भालेराव हे तेजस्विनी सायकलिंग क्लबचे सक्रिय सदस्य असून सायकलिंगच्या माध्यमातून आरोग्य, पर्यावरण संरक्षण आणि फिटनेसचा संदेश ते समाजापर्यंत पोहोचवत आहेत.
त्यांचा हा संकल्प इतरांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे. अधिकाधिक नागरिकांनी सायकलचा वापर करून इंधन बचतीसाठी व पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा, हीच अपेक्षा असल्याचे भालेराव म्हणाले.यासह “सायकल चालवा, आरोग्य जपा, इंधन वाचवा आणि पर्यावरणाचे रक्षण करा! हा संदेश ते पोहोचविण्यात हातभार लावत आहेत. या संकल्पाबद्दल पोलीस आयुक्त प्रवीण पवार,सिटीचौक पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी,तेजस्विनी सायकलिंग क्लबच्या अध्यक्षा निता गंगावणे आदींनी त्यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.