header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

जिल्हाधिकाऱ्यांची पिंपरी गावात भेट

https://hinduprakashwarta.com/wp-content/uploads/2026/06/1000458593.jpg

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाची केली विचारपूस

जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी आज पिंपरी ता. कन्नड या गावास भेट दिली. येथे त्यांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांची भेट घेतली व जनगणना कार्याची पडताळणी केली.

त्यांच्या समवेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनू पी एम, अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकूणे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, तहसीलदार संतोष गुट्टे, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन तसेंच अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

शेतकरी आत्महत्यग्रस्त कुटुंबाची भेट

जिल्हाधिकारी गौडा यांनी पिंपरी या गावातील विष्णू काशिनाथ जोगदंड या दिवंगत शेतकऱ्याच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. या कुटुंबाला विविध शासकीय योजनांचे देण्यात आलेले लाभ, त्यांची सद्यस्थिती याबाबत आस्थेवाईकपणे विचारपूस केली. तसेच आगामी हंगामासाठी बियाणे थैली दिली.

जनगणना पडताळणी

याच गावात झालेल्या जनगणना कार्याची पडताळणी ही जिल्हाधिकारी गौडा यांनी केली. बाबुलाल भाऊलाल कुदळे यांच्या कुटुंबाची गणना झाल्याची खात्री त्यांनी मोबाईल अँपवर करून खात्री केली.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90