header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

झाल्टा फाट्यावर एमडी ड्रग्जचा साठा जप्त; दोन तस्कर जेरबंद

https://hinduprakashwarta.com/wp-content/uploads/2026/06/1002473399.jpg

ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; ७.३९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

छत्रपती संभाजीनगर : अमली पदार्थांच्या वाढत्या तस्करीविरोधात छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत झाल्टा फाटा परिसरातून मेफेड्रोन (एमडी) या घातक अमली पदार्थासह दोन आरोपींना अटक केली. या कारवाईत ६२.२७ ग्रॅम एमडी पावडरसह कार, मोबाईल फोन, डिजिटल वजनकाटा व रोख रक्कम असा एकूण ७ लाख ३९ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक प्रकाश भाऊसाहेब जाधव व अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने झाल्टा फाटा येथे सापळा रचला.

सायंकाळी सहाच्या सुमारास संशयित कार (एमएच १४ एचयू ०६३९) अडवून झडती घेतली असता अर्जुन मिट्टी साबळकर (वय २८, रा. पाचोड, ता. पैठण) आणि नरेश मांगीलाल बिश्नोई (वय २९, मूळ रा. जालोर, राजस्थान, सध्या पाचोड) यांच्या ताब्यातून २ लाख ४९ हजार ८० रुपयांची एमडी पावडर आढळून आली. आरोपींकडून ड्रग्ज विक्रीसाठी वापरण्यात येणारा डिजिटल वजनकाटा, मोबाईल फोन आणि रोख रक्कमही जप्त करण्यात आली.

या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३६१/२०२६ अन्वये एनडीपीएस कायद्याच्या कलम 8(c), 22(c) व 29 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे, पोलीस हवालदार कासीम शेख, सचिन राठोड, सुनील गोरे, अंगद तिडके, रवि लोखंडे, पोलीस अंमलदार बलबिरसिंग बहुरे, शिवाजी मगर, योगेश तरमळे तसेच चिकलठाणा पोलीस ठाण्याचे सचिन ढवळे, दीपक देशमुख, एफएसएलचे प्रतिक जाधव, साक्षी राठोड आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सहभागातून पार पडली.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90