खासदार निवडून दिल्याचा जनतेमध्ये पश्चाताप.
हिंदू प्रकाश वार्ता परभणी प्रतिनिधी.
शिवसेना उभाताचे खासदार संजय जाधव यांची बंडखोरी नंतर सोनपेठ येथे गुरुवार दिनांक 18 जून रोजी जोडे मारो आंदोलन करत प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली सोनपेठ येथील निष्ठावान शिवसैनिकांनी आक्रमक होऊन आंदोलन केले. सोनपेठ येथील शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यालयाबाहेर सकाळपासून शिवसैनिक संतप्त झाल्याचे पहावयाला मिळाले कार्यकर्त्यांनी खासदार संजय जाधव यांच्या छायाचित्राला चपलाचा हार घालून प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली गद्दार संजय जाधव अशा घोषणा देत मोठा जमाव छत्रपती शिवाजी महाराज चौकात गोळा होऊन संजय जाधव यांच्या प्रतिकात्मक अंत्ययात्रेचे दहन करण्यात आले सोनपेठ येथील शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे सोबत असल्याचा निर्धार केला सोनपेठ येथील आंदोलनाला शिवसेना विधानसभा प्रमुख माजी आमदार कल्याण रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख कृष्णा पिंगळे, तालुकाप्रमुख संतोष गवळी शहर प्रमुख अमोल दहिवाळ श्रीकृष्ण साठे रामेश्वर पाडोळे बाबुल शेख संजय जाधव गणेश जोशी भास्कर भोसले वैभव यादव तुकाराम साठे सिद्धेश्वर आव्हाड गणेश यादव तेजस भोसले इमरान सय्यद ज्ञानेश्वर परसे वैभव सुरवसे गोपाळ भोसले फिरोज पठाण अशोक सुरवसे सुदर्शन बदाले रमेश उंडाळकर महादेव तूप समुद्र गौतम शिंदे महेश भोसले विनोद यादव माऊली शिंदे अजित शिवसैनिक उपस्थित होते .