खुलताबाद प्रतिनिधी खुलताबाद आज जून महिना दि १९ रोजी दुपारी भर उन्हामध्ये मेंढपाळाची चारा व पाण्यासाठी भटकती सुरू आहे पावसाने दडी मारल्यामुळे ग्रामीण भागात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा सर्वाधिक फटका गोरगरीब मेंढपाळ करणाऱ्यांना बसत असून, जनावरांच्या चार्याचा आणि पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. खुलताबाद आणि परिसरात जंगलात कुठेही चारा उपलब्ध नसल्याने, आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी आणि मुक्या जनावरांना जगवण्यासाठी मेंढपाळांना भर उन्हात एका गावातून दुसऱ्या गावी स्थलांतर करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याची प्रतिक्रिया मेंढपाळ यांनी दिली