परभणीत पहाटेपासूनच एटीएस ची मोठी कारवाई.
हिंदू प्रकाश वार्ता परभणी प्रतिनिधी.
शहरात शनिवार 20 जून रोजी पहाटे सात वाजल्यापासून सुरक्षा यंत्रणांनी अत्यंत गोपनीय आणि गुप्तपणे मोठी कारवाई सुरू केली आहे एटीएस कडून शहरातील विविध 15 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आली आहेत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या कारवाईमध्ये एकूण 26 जणांचे पथक कार्यरत असून शहरातील 15 वेगवेगळ्या ठिकाणी तपास सुरू शहरातील धार रोड परिसरातील मुमताज कॉलनी विटीच्या पथकाकडून छापेमारी सुरू असल्याने या ठिकाणी एटीएसचे पथक व परभणीतील पोलीस मोठ्या प्रमाणात दाखल झाले असून या ठिकाणी अक्षरशः छावणीच्या स्वरूप आले आहे तसेच जनता मार्केटमध्येही असलेल्या राजकोट स्वीट्स च्या बाजूला असलेल्या एका मशिनरीच्या दुकानावर तसेच नोबल हॅन्डलूम अँड होजीअरी या दुकानाजवळ पथकाने धाड टाकली चे समजते आहे सदरची ही कारवाई संशय दहशतवादी कारवाया संशयास्पद आर्थिक व्यवहार (टेरर फंडिंग ) किंवा देश विरोधी कृत्याशी संबंधित असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे बाहेरून आलेले असल्याचे स्थानिक पातळीवर कमालीची गुप्तता पाळली जात आहे या कार्यवाहीमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कसले असून उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे या छापेमारी बाबत अधिकृत यंत्रणेकडून अद्याप कोणतेही माहिती देण्यात आलेली नाही तपास कार्य पूर्ण झाल्यानंतरच या कार्यवाहीचा सविस्तर खुलासा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सदन कारवाई करण्याकरता क्रुझर गाड्यांमधून बाहेर गावचे अधिकारीदाखल झाले असून या गाड्यांमध्ये प्रत्येक गाडीवर एबीसीडी अशाप्रकारे मार्किंग करण्यात आली होती सदर कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने व गुप्तपणे चालू आहे त्यामुळे सदरील पथकाला यातून काय निष्पन्न झाले किंवा काय हाती लागले तेच काही समजू शकले नाही.