30 ते 40भावीक गाभाऱ्याखाली दबल्याची माहिती.बचाव कार्य तातडीने सुरू.
हिंदू प्रकाश वार्ता परभणी प्रतिनिधी:- कोल्हा शिवारात परभणी ते मानवत रस्त्यावरील ओला शिवारात असलेल्या प्रसिद्ध यशवाडी मारुती मंदिरात शनिवारी 20 जून रोजी दुपारच्या तीनच्या सुमारास भीषण दुर्घटना घडली मंदिर निर्माण कार्य चालू असताना मंदिराच्या गाभार्याचा काही भाग कोसळून झालेल्या अपघातात पाच भाविकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून 30 ते 40 भाविकजखमी झाले आहेत या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून परिसरात हळूहळू व्यक्त केली जाते आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार यश वाडी येथील मंदिराच्या गाभाऱ्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू होते राजस्थान येथील जड दगडाचा वापर केला जात होता मुख्य दिवस असल्याने दुपारच्या सुमारास भाविक गाभाऱ्या दर्शन घेत असतानाच राजस्थानी भाविकाच्या अंगावर कोसळले गाभारा कोसळल्याने मंदिरात एकच गोंधळ आणि पळापळ सुरुवात झाली निर्माण झाली या अनेक भाविक दगडांच्या ढीगाराखाली गाडले गेले यामध्ये पाच जागीच मृत्यू झाल्याचा अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत जखमीला शासकीय रुग्णालय येथे पोहोचवण्यात आले या दुर्घटनेत मृताचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात असून अधिकृत तपशील व मृताची नावे संतोष गडदे राहणार पांगरा आकाश सुरजसे राहणार गंगाखेड रोड परभणी नुमेश अग्रवाल राहणार जिंतूर श्रीकृष्ण बलभीम गवारे चिंचवडगाव राहणार वडवणी हे मयत झालेल्या व्यक्तींची नावेअसून अनिकेत संतोष राहणार मंठा हनुमान लिपणे प्रवीण प्रकाश राजबिंडे. नारायण दौलत खरात राहणार जवळा दादाराव भांगे राहणार जवळा रामकृष्ण भदाडे राहणार माजलगाव परमेश्वर कुंडलिक राऊत राहणार लोणी केशव गिरी राहणार देऊळगाव आवचार नागेश विठ्ठलराव इक्कर राहणार कुंभारी . प्रवीण रघुनाथ हलगे राहणार सेलू नितली सौरभ गजानन कोतकर ऋषिकेश कोरपेटकर राहणार नितळी रामा घुगे रामेश्वर बोंडे राहणार चिंचोली राहणार कुंभारी बाजार अशी जखमींची नावे असून जखमी ना शासकीय रुग्णालयात पोहोचण्यात आले पुढील उपचार चालू असून यावेळी आमदार राजेश विटेकर जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण शिवसेना नेते सईद खान कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पंकज आंबेगावकर यांनी घटनास्थळी भेट दिली असून बचाव कार्यास मदत करत आहेत पोलीस प्रशासनाचा या घटनेला पुढील तपास करत असून मुख्यमंत्री सहायता निधी मधून मयतास पाच लाखाचा अर्थसाह्य तसेच जखमीस एक लाख अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली आहे. सदरील हे प्रकरण मंदिर बांधकाम करणाऱ्या गुत्तेदाराच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याची भाविक भक्तामध्ये चर्चा सुरू झाली आहे