आज दिनांक- 23 जून 2026 रोजी आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य नाशिक च्या छत्रपती संभाजी नगर प्रकल्प कार्यकारणी ची बैठक मा. प्रकल्प अधिकारी मॅडम यांच्यासोबत यशस्वीपणे संपन्न झाली, या बैठकीला राज्य कार्याध्यक्ष मा. साहेबराव मोहोड सर, राज्य उपाध्यक्ष व विभागीय अध्यक्ष अमरावती मा. शंकर माने सर, राज्य उपाध्यक्ष व नागपूर विभागीय अध्यक्ष मा. रवींद्र नगराळे सर, राज्य प्रसिद्धी विभाग प्रमुख संजय देशमुख सर, छत्रपती संभाजी नगर प्रकल्प अध्यक्ष सुधाकर जाधव सर, राज्य सदस्य सुनिल लोखंडे सर, राज्य सदस्य जितेंद्र सोळुंके सर, राज्य सदस्य दीपक तुरोरीकर सर, विभागीय सदस्य विलास पाटील सर, विभागीय सदस्य अशोक गायकवाड सर, मोकडे सर, किनाके सर व भोसले सर, बन्सी काळे सर, राजेंद्र काकडे सर, बिराजदार सर, प्रमोद जाने सर कामाठी हे उपस्थित होते. बैठक अत्यन्त खेळीमेळीच्या वातावरणात झाली, बैठकीच्या सुरवातीला संघटनेचे राज्य प्रसिद्धी विभाग प्रमुख संजय देशमुख सर यांनी सूत्रसंचालन करून संघटनेचा थोडक्यात इतिहास सांगून व सर्वांचा परिचय करून केली, त्यानंतर आदरणीय प्रकल्प अधिकारी चेतना मोरे मॅडम यांचा सत्कार राज्य कार्याध्यक्ष साहेबराव मोहोड सर व सर्व कार्यकारणी तर्फे करून करण्यात आली, यानंतर राज्य कार्याध्यक्ष साहेबराव मोहोड सरांनी विविध समस्या प्रकल्प अधिकारी मॅडम यांच्या समोर मांडून केली यात दरमहा होणारा वेतन विलंब यावर सविस्तर चर्चा करण्यात आली, यामध्ये दरमहा 15 ते 25 तारखेपर्यंत सर्व शाळांचे वेतन बिल मागवून घ्यावे व 26 तारखेला ज्या शाळेचे बिल येईल ते स्वीकारू नाही असे ठरले, त्यानंतर सेवा पुस्तकाचा मुद्दा घेण्यात आला, काही शाळेत सेवा पुस्तकं नाहीत व ते अद्यावत करून द्वितीय प्रत सदरील कर्मचाऱ्यांना देण्यात यावे व अपडेट करावीत असा मुद्दा घेण्यात आला, यानंतर DCPS व Gpf चा मुद्दा पावत्या व हिशोब देण्यात यावा असे ठरले, यानंतर पात्र कर्मचारी यांचे वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी चे प्रस्ताव शाळाना मागवून घ्यावे व वरिष्ठ कार्यालयात पाठवावे असे ठरले, Ptsd निवृत्ती ची प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्यात यावीत असे ठरले, मेडिकल बिल वेळेवर काढण्यात यावेत असे ठरले, ज्या शाळेत अधीक्षक व अधिक्षिका पदे रिक्त असतील तिथे पदभरती तात्काळ करून घ्यावी अशी मागणी करण्यात आली, पहारेकरी पद दोन अनुदानित मध्ये रिक्त आहे ते भरण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली, ऐनवेळी आलेले विषय सुद्धा घेण्यात आले, आभार प्रदर्शन राज्य सदस्य जितेंद्र सोळुंके सरांनी केले तर राज्य कार्यकारणी तर्फे आभार राज्य प्रसिद्धी विभाग प्रमुख संजय देशमुख सरांनी मानले..