header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

पालकमंत्री सौ. मेघना बोर्डीकर यांच्या प्रयत्नातून जिल्ह्याला मिळाले रू. १०३२.३४ कोटी…!जिंतूर तालुक्याला रस्त्यांच्या विकासासाठी मिळाले ३८० कोटी,जिंतूर सेनगाव रस्त्या आता होणार.

https://hinduprakashwarta.com/wp-content/uploads/2026/06/1000372069.jpg

जिंतूर (दि. २५ जून)

पालकमंत्री सौ. मेघना बोर्डीकर यांच्या प्रयत्नातून परभणी जिल्ह्याला रू.१०३२.३४ कोटींच्या विकास गुंतवणूकीतून रस्ते, आरोग्य,प्रशासन आणि शिक्षण क्षेत्राला नवी गती मिळणार तर जिंतूर तालुक्याला रस्त्यांच्या विकासासाठी ३८० कोटी मिळाले आहेत. यात जिंतूर- शेवडी माणकेश्वर – येलदरी -सेनगाव या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून घेतला आहे. या विकास गुंतवणुकी मुळे जिंतूर तालुक्यातील रस्ते जाळे अधिक सक्षम, आधुनिक आणि भविष्योन्मुख होणार आहे, यामुळे दळण वळणाच्या सुविधा अधिक बळकट होत गावागावांतील संपर्क अधिक सुलभ आणि गतिमान होईल तसेच सुदृढ रस्ते, वेगवान प्रवास आणि विकासाला नवी दिशा देणारा हा निर्णय जिंतूर तालुक्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.तसेच हा मुख्य मराठवाडा व विदर्भ यांना जोडणाराअसल्याने याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.माध्यमाशी बोलताना असे मत पालकमंत्री सौ. मेघना बोर्डीकर यांनी व्यक्त करत या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सौ. सुनेत्रा पवार यांचे आभार मानले आहेत.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90