header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

*ब्लू व्हॅली इंग्लिश स्कूलमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी*

बिडकीन, प्रतिनिधी

पैठण तालुक्यातील बिडकीन येथील सेठ मोतीलाल तोतला शैक्षणिक संस्था संचालित ब्लू व्हॅली इंग्लिश स्कूल येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या पर्यवेक्षिका वर्षा चव्हाण यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून व पुष्पपूजन करून करण्यात आली. यावेळी शाळेचे शिक्षक दत्तात्रय चेडे यांनी विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनकार्याची, सामाजिक न्यायासाठी केलेल्या कार्याची तसेच शिक्षण, समता आणि आरक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची सविस्तर माहिती दिली. शाळेतील विद्यार्थ्यांनीही राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित मनोगते व्यक्त करून त्यांचे विचार उपस्थितांसमोर मांडले. कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90