header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

जिल्हाधिकाऱ्यांची मतदान केंद्रासह घरभेटिद्वारे प्रत्यक्ष पाहणी

एकही पात्र मतदार वंचित राहू नये; जिल्हाधिकारी नतिशा माथुर यांचे निर्देश

हिंदू प्रकाश वार्ता प्रतिनिधी 

 परभणी-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरु असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने  जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी  नतिशा माथुर यांनी 96 -परभणी विधानसभा मतदारसंघातील परभणी शहरातील गांधी विद्यालय, खोली क्र. १ येथील मतदान केंद्रास तसेच ग्रामीण भागातील कारेगाव येथील मतदान केंद्रास प्रत्यक्ष भेट देऊन सुरू असलेल्या कामकाजाची पाहणी केली.

यावेळी  जिल्हाधिकारी यांनी मतदान केंद्रांवर सुरू असलेली मतदार पडताळणी, घरभेटी, आवश्यक कागदपत्रांची तपासणी, प्रगणक प्रपत्र भरण्याची प्रक्रिया तसेच विशेष सखोल पुनरीक्षणाची संपूर्ण कार्यपद्धती याची सविस्तर माहिती घेतली. त्यांनी संबंधित बीलओ व बीएलओ पर्यवेक्षकांशी संवाद साधून कामकाजाचा आढावा घेतला.

त्यानंतर  जिल्हाधिकारी यांनी मतदान केंद्राच्या कार्यक्षेत्रातील प्रत्यक्ष मतदारांच्या घरी भेट देऊन विशेष सखोल पुनरीक्षण  अंतर्गत प्रगणक प्रपत्र भरण्याच्या प्रक्रियेची पाहणी केली. त्यांनी मतदारांशी संवाद साधत आवश्यक माहिती व कागदपत्रांची पडताळणी करून प्रगणक प्रपत्र प्रत्यक्ष भरून घेतला. तसेच प्रत्येक पात्र मतदाराचा प्रगणक प्रपत्र अचूक, संपूर्ण व वेळेत भरून घेण्यात यावा, आवश्यक कागदपत्रांची योग्य पडताळणी करण्यात यावी तसेच भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचना संबंधित बीलओ व बीएलओ पर्यवेक्षकांना दिल्या.

प्रत्येक पात्र मतदारापर्यंत पोहोचून त्यांची माहिती अचूक व अद्ययावत करण्यासाठी आवश्यक ती दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच आवश्यक कागदपत्रांची काटेकोर पडताळणी करून भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व प्रक्रिया पार पाडण्याबाबत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना केल्या.

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम प्रभावी, पारदर्शक व वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रत्येक प्रगणक प्रपत्र अचूक व संपूर्ण भरून घेणे, प्रत्येक अर्जाची नियमानुसार तपासणी करून कार्यवाही करणे, कोणताही पात्र मतदार वंचित राहू न देणे तसेच मतदार यादी अधिकाधिक अचूक व त्रुटीरहित करण्यासाठी समन्वयाने काम करावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90