header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

अजिंठा घाटातील पावसाच्या नाल्या गाळाने तुंबल्या; अपघाताचा धोका वाढला

*डोंगरकड्यावर झाडे व दगड लटकलेल्या अवस्थेत; तातडीने सफाईची चालकांची मागणी*

हक्कानी शेख 

फर्दापूर, दि. ५ : छत्रपती संभाजीनगर–जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील अजिंठा घाटात पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या अनेक नाल्या गाळ, मुरूम व मातीमुळे तुंबल्या आहेत. तसेच घाटातील डोंगरकड्यावर अनेक ठिकाणी झाडे आणि दगड धोकादायकरीत्या लटकलेल्या अवस्थेत असल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

फर्दापूर परिसरात सध्या रिमझिम पाऊस सुरू असून, पावसाचा जोर वाढल्यास तुंबलेल्या नाल्यांमधील पाणी थेट महामार्गावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे रस्त्यावर पाणी साचून नव्याने खड्डे पडण्याबरोबरच अपघातांचा धोका वाढणार असल्याची भीती वाहनचालकांनी व्यक्त केली आहे.

घाटातील नाल्यांची नियमित साफसफाई आणि डोंगरकड्यावरील धोकादायक झाडे व सैल झालेले दगड हटविण्याचे काम अद्याप झाले नसल्याने संबंधित विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या कामांकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक असल्याची मागणी प्रवासी व वाहनचालकांकडून होत आहे.

पावसाचा जोर वाढण्यापूर्वी घाटातील सर्व नाल्यांची साफसफाई करून पाण्याचा निचरा सुरळीत करावा तसेच डोंगरकड्यावरील धोकादायक झाडे व दगड त्वरित हटवावेत, अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशारा वाहनचालकांनी दिला आहे.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90