header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

महारक्तदान शिबिरात जिंतूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ४२२ रक्तदात्यांचे रक्तदान, महिलांचा विक्रमी सहभाग

जिंतूर

तालुका प्रतिनिधी 

         विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने, लोकमत  ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक तथा लोकमतचे संस्थापक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त येथील नगरेश्वर मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान शिबिराला जिंतूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सलग सहाव्या वर्षी झालेल्या या सामाजिक उपक्रमात तब्बल ४२२ रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवतेचा संदेश दिला. विशेष म्हणजे, १०० हून अधिक महिलांनी रक्तदान करून उल्लेखनीय सहभाग नोंदविला.

शिबिराच्या अध्यक्षस्थानी सुंदरलाल सावजी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष मुकुंद सावजी कळमकर होते. उपविभागीय महसूल अधिकारी शैलेश लाहोटी यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी लोकमतचे संपादक राजेश निस्ताने, सहाय्यक सरव्यवस्थापक रमेश तावडे, नगराध्यक्ष प्रताप देशमुख, पोलीस निरीक्षक नामदेवराव रेड्डी, ज्येष्ठ विधिज्ञ अशोक सोनी, नायब तहसीलदार प्रशांत राखे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आबासाहेब जाधव, जिल्हा रुग्णालय रक्तपेढी प्रमुख डॉ. मनिषा राठोड, डॉ. क्षीरसागर, डॉ. दिपा परिहार, दिलीप देशपांडे, रमेश दरगड, मोहसिन पठाण, विधिज्ञ तथा नगरसेवक गोपाळ रोकडे, दत्ता कटारे, मुन्ना कुरेशी, शेख अथर, प्रदीप चौधरी, पंचायत समिती सदस्य बालाजी सांगळे, गजानन वट्टमवार, मनोज राजोतिया, विधिज्ञ मनोज सारडा आदी मान्यवर उपस्थित होते.

        सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत चाललेल्या शिबिरात जिल्हा शासकीय रुग्णालय, परभणी येथील रक्तपेढीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदात्यांना उत्कृष्ट सेवा दिली. युवकांसह महिलांचा मोठा सहभाग आणि उत्साह हे यंदाच्या शिबिराचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. मान्यवरांचे रक्तदान जिल्हा परिषद सदस्य कृष्णकांत देशमुख, पोलीस निरीक्षक नामदेवराव रेड्डी, बीड जिल्हा सहाय्यक अभियोगता विधिज्ञ योगेश सरोदे, नगरसेवक दत्ता कटारे, गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे, प्राचार्य कैलास मुटकुळे, औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष धर्मचंद अच्छा, प्रा. नारायण शिंदे, प्रा. पांडुरंग निळे, प्रा. सुरेश पारवे, डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. शिवप्रसाद सानप, प्रा.बाळू बुधवंत, गजानन वराड, संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष अभिजित देशमुख सह पत्नी यांच्यासह अनेक मान्यवरांनी रक्तदान केले. तर परिवारासह रक्तदान डॉ.योगेश दहिफळे, पंकज तोष्णीवाल, डॉ. शैलेश मंत्री, प्रा. बाळू बुधवंत, तेजल शहा, भास्कर काळे, सचिन चिद्रवार यांच्यासह अनेक कुटुंबांनी एकत्रित रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. मान्यवरांच्या सदिच्छा भेटीत वाशिमचे शिक्षणाधिकारी प्रा. विठ्ठल भुसारे, जिल्हा परिषद सदस्य डॉ. देवराव कऱ्हाळे, भगवान वटाणे, अजय चौधरी, प्राचार्य डॉ. श्रीधर भोंबे, माजी नगराध्यक्ष तथा गटनेते सचिन गोरे, किरण वट्टमवार, केशव बुधवंत, डॉ. जी. जे. वाघमारे, डॉ. दिनेश बोराळकर, विधिज्ञ विनोद राठोड, मनिषा केंद्रे, शिवराम ढोणे, नामदेव पोटे, सुनील तोष्णीवाल आदींनी शिबिराला भेट देऊन आयोजकांचे अभिनंदन केले.

प्रचारासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर

          रक्तदान शिबिराच्या प्रचार-प्रसारासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यासाठी प्रफुल्ल साबू यांनी विशेष सहकार्य केले. तसेच विविध शाळांच्या मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी जनजागृती मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.

यशस्वीतेसाठी सर्वांचे मोलाचे योगदान व शिबिर यशस्वी करण्यासाठी मंचक जगताप, भागवत चव्हाण, सचिन रायपत्रीवार, संदीप माहूरकर, शंतनु कुलकर्णी, दिलीप देवकर, चंद्रकांत गवळी, गुलाबराव शिंदे, संतोष चौधरी, शेख नूर, राम रेघाटे, सुधीर शहाणे, सुभाष मस्के, रणधीर शोभणे, सचिन देवकर, गणेश कुरे, सुदर्शन अच्छा, पुरुषोत्तम पोरवाल, घनश्याम जेठलिया, सुनील वट्टमवार, आलोक साबू, गजानन खैरीकर, मनीषा वाघमारे, जयश्री देशपांडे, शैला बंगाळे यांच्यासह व्हॉईस ऑफ मीडिया, जिंतूर तालुका प्रेस क्लब, योग परिवार, ज्ञानोपासक परिवार, शब्द सह्याद्री, राजस्थानी युवक मंडळ, आर्य वैश्य युवक मंडळ आणि विविध सामाजिक संस्थांनी मोलाचे सहकार्य केले.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90