अजिंठा प्रतिनिधी सय्यद जमिरोद्दीन
मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सिल्लोड तालुक्यातील शिवना ग्रामपंचायत कार्यालयात बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) यांची आढावा बैठक पार पडली. बैठकीस गटविकास अधिकारी रत्नागर पगार प्रमुख उपस्थित होते.
बैठकीत एसआयआर मोहिमेअंतर्गत मतदार यादी शंभर टक्के अचूक व अद्ययावत करण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. नवीन मतदारांची नोंदणी, मृत व स्थलांतरित मतदारांची नावे नियमानुसार वगळणे, तसेच प्रत्येक पात्र मतदाराची माहिती घरोघरी जाऊन पडताळून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करून निर्धारित मुदतीत सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश गटविकास अधिकारी रत्नागर पगार यांनी दिले.
यावेळी एसआयआर मोहिमेच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बीएलओंना येणाऱ्या अडचणी जाणून घेऊन त्यावर मार्गदर्शन करण्यात आले. मतदार यादी अधिक पारदर्शक, अचूक आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी सर्व संबंधितांनी जबाबदारीने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी याहिया सर, कलीम सर, विजय काळे, झानगीर सर, परवेज सर, शाफकत सर, रिजवान सर,संतोष वाघ, अशरफ काजी सर,शेषराव जगताप सर,समद सर,तसेच अंगणवाडी सेविका विमल मुठे, आरती चितळे, सुनीता जगताप यांच्यासह बीएलओ, संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.