header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

दूध तापवताच दुधातून निर्माण झाले रबरा सारखा पदार्थ.

 एफ डी ए व पोलिसाकडून चौकशी सुरू. खाजगी दूध विक्रेत्यावर कारवाईची बडगा.

हिंदू प्रकाश वार्ता प्रतिनिधी 

 परभणी आता कुठलीही वस्तू घेतली की त्यामध्ये भेसळ मिळणारच पूर्ण महाराष्ट्रातच भेसळयुक्त वस्तूने कहर केला आहे शुद्धतेचे प्रमाण  केवळ नाममात्र दिसून येईल ग्रामीण भागातल्या दूध विक्री  करणाऱ्या शेतकऱ्यांकडे सकाळी भल्या पहाटे दूध वाल्याची वाट पाहतात व त्या दुधाचा चहा पिऊन मनाला प्रसन्नता जाणून घेतात पण त्या अमृततुल्य दुधाला भेसळीची झालर लागल्यामुळे रेती माफिया औषधी माफिया केमिकल माफिया खवा माफिया तसेच नव्याने दूध भेसळ माफियाची निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली असून सर्वसामान्य गरीब जनतेचा प्रिय पदार्थ म्हणून चहाकडे बघितले जाते पण त्याच्या मध्ये चक्क विष मिसळण्याचं काम हे दूधवाले माफिया करत आहेत असाच एक धक्कादायक प्रकार पूर्णा शहरात उघडकीस आला ग्रामीण भागातील दूधवाले कडून दूध विकत घेऊन तें दूध तापवल्यानंतर रबर सदस्य पदार्थ निर्माण झाला हे रबरा सारखा पदार्थ  पाहण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडाली हे पाहून मोठी खळबळ उडाली असून या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित दूध विक्रेत्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी समस्त नागरिकाकडून होत आहे अधिक माहिती अशी की पूर्ण शहरातील कोळीवाडा परिसरातील संतोष भंगे यांच्या मुलगा धारेश्वर भंगे यांनी बुधवार दिनांक 8 जुलै रोजी रात्री सुमारे नऊ वाजता सराफा बाजार परिसरातील स्टॉल लावून दूध विक्री करणारे गणेश भगवानराव बोबडे राहणार माटेगाव तालुका पूर्णा अर्धा लिटर दूध खरेदी केले दूध घरी आणल्यानंतर त्यांनी ते तापवण्यासाठी ठेवले थोड्याच वेळात रबरा सारख्या पदार्थांमध्ये रूपांतर झाले दूध आटून खवा होण्याऐवजी रबर सदर्ष्य पदार्थ निर्माण झाल्याने भंगे कुटुंबीय घाबरले हा प्रकाराची चर्चा परिसरात पसरताच जे जे लोक त्या स्टॉल वरून   दूध घेत होते  त्यांचे ते धाबे दणाणले या घटनेचे प्रकाराची माहिती तात्काळ स्थानिक पोलीस तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाशी संपर्क साधून कळविण्यात आली माहिती मिळताच अन्न व औषध भेसळ निरीक्षक विश्वंभर ठोंबरे फौजदार अमर चाऊस आणि पोलीस कर्मचारी चंद्रकांत कुदलवार यांनी घटनास्थळी प्राथमिक चौकशी केली दरम्यान सदरील दूध विक्रेता गणेश भगवानराव बोबडे याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती असून पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे तपास अहवाल आल्यानंतर संबंधिताविरोधात अन्नसुरक्षा व मानके कायद्यानुसार तसेच गुन्हा दाखल होण्याची व्यक्त केली जात आहे पूर्ण शहरातील दूध विक्री च्या व्यवसायावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून खाजगी दूध विक्रेत्याकडून विकल्या जाणाऱ्या दुधाचे व्यापक तपासणी करून दोषीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून आणि या प्रकरणात एफडीएच्या अहवालाकडे आणि पुढील कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90