header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

​घाणीत चालत होता तेलाचा खेळ, आरोग्याचा बट्ट्याबोळ; ‘बागारिया’वर एफडीएची धाड, लायसन्स केले तात्काळ रद्द

हिंदू प्रकाशवार्ता 

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी

लोकांच्या आरोग्याशी खेळून स्वतःची खिसे भरणार्‍या नफेखोरांना अन्न व औषध प्रशासनाने (FDA) जोरदार झटका दिला आहे. राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेचा कडक दणका आता छत्रपती संभाजीनगरात बसला असून, अस्वच्छतेचे साम्राज्य असलेल्या दोन मोठ्या ऑइल रिपॅकिंग युनिट्सवर प्रशासनाने थेट सर्जिकल स्ट्राईक केला आहे. पैठण तालुक्यातील मे. बागारिया ॲग्रो प्रॉडक्ट्स आणि शहरातील मे. बागारिया व्हेजिटेबल प्रॉडक्ट्स प्रा. लि. या दोन्ही युनिट्सवर एकाच वेळी छापे मारून तब्बल २ कोटी ९३ लाख ३५ हजार ६०३ रुपयांचा संशयित निकृष्ट दर्जाचा खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला आहे. या गंभीर प्रकारानंतर दोन्ही आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत.

​सहाय्यक आयुक्त डी. व्ही. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकार्‍यांच्या पथकाने जेव्हा या युनिट्समध्ये पाऊल ठेवले, तेव्हा तिथले दृश्य पाहून अधिकारीही चक्रावून गेले. रिफायनरी विभागातील महागड्या यंत्रसामग्रीवर धूळ, कोळीची जाळी, गंज आणि साचलेली घाण ढसढशीतपणे दिसत होती. ​फरशी, भिंती आणि आजूबाजूचा परिसर अत्यंत दुर्गंधीयुक्त होता. ​सगळ्यात धक्कादायक म्हणजे, ज्या जुन्या आणि वापरलेल्या टिन्स (डब्यांमध्ये) खाद्यतेलाचे रिपॅकिंग केले जात होते, ते अत्यंत अस्वच्छ होते. बंद असलेली रिफायनरी आणि चालू असलेला रिपॅकिंग विभाग एकाच आवारात असल्याने तेल दूषित होण्याचा अत्यंत गंभीर धोका अधिकार्‍यांनी जागेवरच नमूद केला. “जनतेच्या ताटात विष कालवण्याचा प्रयत्न करणार्‍यांची गय केली जाणार नाही. सेफ महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत अशी कडक कारवाई यापुढेही सुरूच राहील,” असा कडक इशारा एफडीए प्रशासनाने दिला आहे.

 ना लॅब, ना प्रमाणपत्र; अस्वच्छतेचेच पूर्ण तंत्र!

​तपासणीत असे आढळून आले की, कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणार्‍या या संस्थेत खाद्यतेलाची गुणवत्ता तपासण्यासाठी आवश्यक असलेली अंतर्गत प्रयोगशाळाच (Lab) गायब होती. ​तपासणीवेळी तेलाचे विश्लेषण अहवाल किंवा घाऊक स्वरूपात आलेल्या तेलाचे ‘सर्टिफिकेट ऑफ ॲनालिसिस’ (COA) उपलब्ध नव्हते. ​तांत्रिक अधिकार्‍याची नियुक्ती केलेली नव्हती. ​ओव्हरहेड टाक्यांवर कोणते तेल साठवले आहे याची कोणतीही ओळख पटत नव्हती आणि टाक्यांवर घाणीचा जाड थर साचला होता. पाईपलाईन आणि पॅकेजिंग साहित्याच्या फूड ग्रेड प्रमाणपत्रांचा पत्ताच नव्हता!

२.९३ कोटींचा तेलसाठा जप्त; नमुने लॅबला रवाना!

​या धडक कारवाईत रिफाइंड पाम, सोयाबीन, कपाशी तसेच एका अज्ञात वनस्पती तेलाचा साठा जप्त करण्यात आला आहे. एकूण २.९३ कोटी रुपयांचा हा संशयित निकृष्ट साठा ताब्यात घेऊन त्याचे नमुने तातडीने शासकीय प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत. ही धडक कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे, पी. एस. कुचेकर, पी. एस. अजिंठेकर आणि योगेश चिभडे यांच्या पथकाने फत्ते केल.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90