header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

अर्थपूर्ती पतसंस्थेचा १० व्या सर्वसाधारण सभेत ११ टक्के लाभांश जाहीर

जिंतूर, प्रतिनिधी :

जिंतूर येथील अर्थपूर्ती पतसंस्थेची १० वी वार्षिक सर्वसाधारण सभा श्री नगरेश्वर मंदिर येथे सभासदांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत आणि उत्साही वातावरणात पार पडली. संस्थेच्या गेल्या वर्षभरातील आर्थिक प्रगती, कामकाजाचा आढावा आणि भविष्यातील वाटचालीबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. सभेत सभासदांच्या भागभांडवलावर ११ टक्के लाभांश (डिव्हिडंड) जाहीर करण्यात आला.

सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रत्नदीप कळमकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून सुंदरलाल सावजी बँकेचे अध्यक्ष मुकुंद सावजी कळमकर उपस्थित होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष किशोर देशपांडे, संचालक मनोज सारडा, ॲड. दर्शन कळमकर, ॲड. वाट्टमवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुकुंद सावजी कळमकर यांनी अर्थपूर्ती पतसंस्थेच्या आर्थिक शिस्तीचे, पारदर्शक कारभाराचे आणि सातत्यपूर्ण प्रगतीचे विशेष कौतुक केले. सभासद कार्यपद्धतीमुळे संस्थेने सहकार क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली असून इतर संस्थांसाठीही ती आदर्श ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

सभेदरम्यान अनेक सभासदांनी संस्थेबद्दलचा विश्वास व्यक्त केला. “वेळेवर मिळालेल्या कर्जामुळे स्वतःचा व्यवसाय उभारता आला आणि आज कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले,” असा अनुभव काही कर्जदारांनी सांगितला. सभासदांचा विश्वास, संचालक मंडळाचे सक्षम नेतृत्व आणि कर्मचाऱ्यांची समर्पित सेवा यांच्या बळावर अर्थपूर्ती पतसंस्था भविष्यातही प्रगतीची नवी शिखरे गाठेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

सभा यशस्वी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक चिद्रवार, मनोज चकोते, कपिल अभुरे, अमोल साळवे, रोकडे, अशोक बंड, ऐश्वर्या कांबळे, साक्षी वाट्टमवार यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.सभासदांच्या विश्वासाला मिळाले यशाचे बळ; १० वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90