header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

महिला शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर व एफपीओ स्थापनेबाबत २२ जुलै रोजी विशेष कार्यक्रम

वाशिम /गोपाल सातपुते 

वाशिम | महिला किसान सक्षमीकरण योजनेअंतर्गत वाशिम जिल्ह्यातील कोंडाळा झामरे (ता. वाशिम) येथे महिला शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर तसेच महिला फार्मर प्रोड्युसर कंपनी (FPO) स्थापनेबाबत विशेष बैठकीचे आयोजन २२ जुलै २०२६ रोजी करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आत्मा (ATMA) प्रकल्प संचालक अनिल महाकळे यांना उपस्थित राहून महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची विनंती भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सौ. कविता परमेश्वर खरात यांनी केली आहे.

या मार्गदर्शन शिबिरामध्ये महिला शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती, आधुनिक शेती तंत्रज्ञान, सामूहिक शेती, मूल्यवर्धन, बाजारपेठ उपलब्धता, आर्थिक सक्षमीकरण तसेच फार्मर प्रोड्युसर कंपनी (FPO) स्थापनेची प्रक्रिया, त्याचे फायदे आणि शासनाकडून मिळणाऱ्या विविध सहाय्य योजनांची सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

महिला शेतकऱ्यांनी संघटित होऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब करावा आणि एफपीओच्या माध्यमातून शेती उत्पादनाला योग्य बाजारपेठ मिळावी, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे सौ. कविता खरात यांनी नमूद केले आहे.

या कार्यक्रमास परिसरातील महिला शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90