header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

स्व. अजितदादा पवार यांची जयंती अधिकृतपणे साजरी होणार; शासकीय कार्यक्रमांच्या यादीत समावेश

छत्रपती संभाजी नगर जिल्हा प्रतिनिधी राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्याचे नेते स्व. अजित अनंतराव पवार (दादा) यांच्या जयंतीचा समावेश सन २०२६ मधील राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या अधिकृत जयंती कार्यक्रमांमध्ये केला आहे. सामान्य प्रशासन विभागाने १५ जुलै, २०२६ रोजी या संदर्भातील अधिकृत परिपत्रक जारी केले असून, यामुळे दादांच्या लोकसेवेचा आणि महाराष्ट्राच्या विकासातील त्यांच्या योगदानाचा राज्य शासनाकडून गौरव करण्यात आला आहे.

​२२ जुलै रोजी राज्यभर होणार भरगच्च कार्यक्रम*
​परिपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, स्व. अजित अनंतराव पवार यांची जयंती २२ जुलै, २०२६ (बुधवार) रोजी राज्यभरात साजरी केली जाणार आहे. या दिवशी मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये दादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले जाईल.

​सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्येही होणार आयोजन*
​हा आदेश केवळ मंत्रालयापुरता मर्यादित नसून, महाराष्ट्र  राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांसह सर्व शाळा व महाविद्यालयांनाही लागू करण्यात आला आहे. 

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90