header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

उलवे  नोड  मधिल  सेक्टर  २४ , २५ ,२५ अ मधिल  रस्त्यावंर  पडलेल्या  खड्ड्यांच्या विरोधात  मनसे  आक्रमक.

खड्डे त्वरित न बुजविल्यास आंदोलनाचा इशारा. 

दै हिंदू प्रकाश वार्ता प्रतिनिधी 

उरण रायगड 

दिनांक  १६ / ०७ /२०२६ रोजी  उलवे नोड  मधिल  महाराष्ट्र  नवनिर्माण  सेनेच्या  पदाधिकारी  व स्थानिक महिलांनी सिडको  अधिकारी  गोसावी  यांची  भेट  घेऊन त्यांना  निवेदन दिले .निवेदन द्वारे रस्ता दुरुस्तीची मागणी करण्यात आली.सेक्टर  २४ ,२५ ,२५ अ मध्ये  रस्त्यांची  अवस्था  फार  खराब  झालेली  आहे. रस्त्यात  खड्डे  आहेत  की  खड्ड्यात  रस्ते  आहेत हेच समजत नाही .मनसेच्या पदाधिकारी व स्थानिक महिला वर्गांनी सिडको अधिकारी  यांच्याशी सविस्तर  चर्चा केली.या प्रसंगी महत्वाची समस्या लक्षात घेता सिडको  अधिकारी  गोसावी यांनी सांगितले की लवकरात  लवकर  सर्व  खड्डे  भरण्यात  येतील  असे आश्वासन  दिले  परंतु खड्डे न भरल्यास रस्त्यांवर  पडलेल्या खड्ड्यात वृक्षारोपण करण्यात येईल असे  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतिने  लेखी  पत्र  देण्यात आले.यावेळी  उलव्याचे  माजी  शहर  अध्यक्ष  राहुल  बाबुराव  पाटील, मनिषा राहुल  पाटील ,तसेच सुनिता नामदेव पाटील, रेश्मा संदेश म्हात्रे, गव्हाण  विभाग  उपाध्यक्ष   बबलु  पाटील, पनवेल  तालुका  सचिव  निर्दोष  केशव  गोंधळी  ,उलवे शहर  अध्यक्ष  आकाश  देशमुख  आदि पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.रस्त्यात असलेल्या खड्ड्यामुळे अनेक लहान मोठे अपघात झाले असून या खड्ड्यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाले. एखादा अपघात होऊन एखाद्याचा मृत्यू सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे रस्ते सुरक्षेला व नागरिकांच्या आरोग्य व जीवनाला सर्वोच्च प्राधान्य देत मनसेने निवेदन देत त्वरित रस्ते, खड्डे दुरुस्तीची मागणी केली आहे.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90