header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

द्रोणागिरी नोडमध्ये कथित बेकायदेशीर मोबाईल टॉवरचा सुळसुळाट; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ थांबवणार कोण ?

दै. हिंदू प्रकाश वार्ता प्रतिनिधी 

उरण रायगड 

उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड परिसरात विविध ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून कथित बेकायदेशीर मोबाईल टॉवर उभारले जात असल्याची गंभीर तक्रार समोर आली आहे. या टॉवरमुळे परिसरातील नागरिकांमध्ये आरोग्याविषयी चिंता वाढली असून, संबंधित यंत्रणांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

नागरिकांचे म्हणणे आहे की, निवासी भागात मोबाईल टॉवर उभारल्यामुळे दीर्घकाळ रेडिओ-फ्रिक्वेन्सी किरणोत्सर्गाच्या संपर्कात राहावे लागते. यामुळे डोकेदुखी, झोप न लागणे, मानसिक तणाव, थकवा, एकाग्रता कमी होणे यांसारख्या तक्रारींची भीती व्यक्त केली जाते. या विषयावर जगभरात विविध अभ्यास सुरू असून, त्यामुळे निवासी भागातील टॉवर उभारणीबाबत सर्व सुरक्षा निकष आणि कायदेशीर नियमांचे काटेकोर पालन होणे अत्यावश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे.

स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून आवश्यक परवानग्यांशिवाय उभारण्यात आलेले टॉवर त्वरित हटवावेत तसेच दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

या संदर्भात शिवसेना द्रोणागिरी शहर प्रमुख जगजीवन भोईर यांनी सिडको प्रशासन व संबंधित शासकीय विभागाकडे अधिकृत पत्रव्यवहार करून कथित बेकायदेशीर मोबाईल टॉवरची सखोल चौकशी करण्याची, नियमांचे उल्लंघन आढळल्यास तातडीने कठोर कारवाई करण्याची आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तांत्रिक तपासणीचा अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे.

द्रोणागिरी परिसरात अवैध बेकायदेशीर मोबाईल टॉवर यांना कोणतेही परवानगी मिळू नये.मोबाईल टॉवर मुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून बेकायदेशीर टॉवर वर त्वरित कारवाई होणे अपेक्षित आहे. त्यासाठी आवश्यक ते पाठपुरावा सुरु आहे.

      – जगजीवन भोईर,  द्रोणागिरी शिवसेना शहर प्रमुख 

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90