header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

परभणी जिल्ह्यातील वर्षातील पहिले नेत्रदान; दोघांना मिळणार दृष्टी

हिंदु प्रकाश वार्ता 

परभणी,: जिल्ह्यात यंदाच्या वर्षातील पहिले नेत्रदान पार पडले असून, या नेत्रदानामुळे दोन अंध व्यक्तींना दृष्टी मिळणार आहे.

 परभणी येथील महेश अनंतराव कुलकर्णी (वय ४९) यांचे दि. १५ जुलै रोजी दुपारी २.४५ वाजता जिल्हा रुग्णालय, येथे निधन झाले. त्यानंतर नेत्र विभागाशी संपर्क साधत नेत्रदानाचा निर्णय कळवला.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सारिका बडे यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्र शल्य चिकित्सक डॉ. गजानन कोंडावार तसेच मयुर जोशी आणि शिवराज देशमुख यांनी तातडीने नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण केली. या कार्यात जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. अर्चना गोरे यांचेही सहकार्य लाभले.

संकलित नेत्रबुबुळे पुढील प्रत्यारोपणासाठी जालना येथील नेत्रपेढीकडे पाठविण्यात आली आहेत. या नेत्रदानामुळे दोन अंध व्यक्तींना दृष्टी मिळण्यास मदत होणार आहे. मृत्यूनंतर नेत्रदानाचा संकल्प करून अधिकाधिक नागरिकांनी  नेत्रदानासाठी पुढे येण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार यांनी केले आहे.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90