header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

​धावत्या एसटी बसने घेतला अचानक पेट; चालकाच्या प्रसंगावधानामुळे ३८ प्रवासी सुखरूप

हिंदू प्रकाशवार्ता प्रतिनिधी 

छत्रपती संभाजीनगर

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सांजखेडा शिवारात एक मोठी दुर्घटना टळली. छत्रपती संभाजीनगरहून बीडकडे जाणाऱ्या एका धावत्या एसटी बसला अचानक भीषण आग लागली. मात्र, बस चालकाने दाखवलेले प्रसंगावधान आणि एका जागरूक नागरिकाच्या सतर्कतेमुळे बसमधील ३८ प्रवासी सुखरूप बचावले असून, मोठी जीवितहानी टळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एसटी बस छत्रपती संभाजीनगरहून बीडच्या दिशेने जात असताना सांजखेडा शिवारात बसच्या मागील बाजूने अचानक दाट धूर निघू लागला. याच दरम्यान मागून स्वतःच्या वाहनाने प्रवास करणारे श्रीगोंदा येथील प्राचार्य अमोल नागवडे यांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यांनी तातडीने पुढे जाऊन एसटी बसच्या चालकाला बसने पेट घेतल्याची माहिती दिली. धूर निघत असल्याची माहिती मिळताच एसटी चालकाने क्षणाचाही विलंब न करता बस रस्त्याच्या कडेला थांबवली. चालकाने तत्परता दाखवत बसमधील सर्व ३८ प्रवाशांना तातडीने आणि सुरक्षितपणे खाली उतरवले. प्रवाशांना खाली उतरवल्यानंतर काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले.​सुदैवाने या घटनेत सर्व प्रवासी पूर्णपणे सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बसला आग लागण्याचे नेमके कारण मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. या घटनेत चालकाच्या प्रसंगावधानाचे आणि प्राचार्य नागवडे यांच्या सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90