header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

जिंतूरमध्ये पतंजली योग समिती व भारत स्वाभिमानची राज्यस्तरीय बैठक संपन्न

*योगाचा प्रसार, संघटन बळकटी आणि आगामी उपक्रमांवर सविस्तर चर्चा; प्रल्हादजी हर्बक (माऊली) यांचे मार्गदर्शन*

जिंतूर प्रतिनिधी

जिंतूर येथील साई सृष्टी गार्डन, वरुड रोड येथे महाराष्ट्र पश्चिम राज्यातील भारत स्वाभिमान व पतंजली योग समितीच्या राज्य कार्यकारिणी सदस्यांची एकदिवसीय बैठक  पार पडली.

बैठकीस प्रल्हादजी हर्बक (माऊली), भारत स्वाभिमान सह राज्य प्रभारी (महाराष्ट्र पश्चिम) यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. त्यांनी योगाचे वैयक्तिक, सामाजिक व राष्ट्रीय जीवनातील महत्त्व अधोरेखित करत प्रत्येक गावात नियमित योगवर्ग सुरू करण्याचे आवाहन केले. तसेच पतंजली योग समितीचे संघटन अधिक सक्षम करण्यासाठी कार्यकर्त्यांनी समर्पित भावनेने कार्य करावे, सदस्य नोंदणी, जनजागृती आणि आगामी उपक्रम प्रभावीपणे राबविण्याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी धोंडीरामजी शेप (भारत स्वाभिमान जिल्हा प्रभारी, परभणी तथा राज्य कार्यकारिणी सदस्य, महाराष्ट्र पश्चिम), वसंतरावजी देशमुख (जिल्हा कोषाध्यक्ष, परभणी), निखिलजी वंजारे (पतंजली योग समिती जिल्हा प्रभारी, परभणी), पुरुषोत्तमजी अंभूरे (भारत स्वाभिमान तहसील प्रभारी, जिंतूर), अॅड. गोपाळराव देशपांडे (पतंजली योग समिती तहसील प्रभारी), लखुजी जाधव (पतंजली किसान सेवा समिती प्रभारी, जिंतूर), सचिनजी रायपत्रीवार (सोशल मीडिया तहसील प्रभारी, जिंतूर), कामाजी जवादे (सोशल मीडिया तहसील प्रभारी, गंगाखेड) तसेच ज्ञानोबाजी बरसाले (भारत स्वाभिमान तहसील प्रभारी, सेलू) उपस्थित होते.

बैठकीत संघटन विस्तार, योग प्रशिक्षण, सामाजिक उपक्रम, सदस्य नोंदणी आणि आगामी कार्यक्रमांच्या नियोजनावर सखोल चर्चा करण्यात आली. राज्यस्तरीय नेतृत्वाच्या मार्गदर्शनामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी काळात पतंजली योग समितीचे कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90