संचालकामध्ये आ. सईद खान आ. नवघरे, मुटकुळे डाखोरे चौकट सावंत मांयदळे. हे विजयी झाले आहेत.
हिंदू प्रकाश वार्ता प्रतिनिधी.
परभणी:- परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चुरशीच्या निवडणुकीत आ. सईद खान. आ. चंद्रकांत नवघरे, शोभा बोबडे, राजामती मुटकुळे, नंदकुमार डाखोरे, आकाश चौखट, अभय सावंत, दत्तात्रय मांयदळे हे सर्व उमेदवारविजयी झाले आहेत.
बँकेच्या 21 संचालकापैकी 13 संचालक बिनविरोध निवडून आले होते उर्वरित आठ संचालकासाठी रविवारी मतदान झाले तर आज दिनांक 20 जुलै रोज सोमवारी सकाळी मतमोजणी पूर्ण झाली.
प्राथमिक कृषी पतपुरवठा विविध सहकारी संस्था गटातील पूर्णा मतदारसंघातून नंद कुमार डाखोरे हे विजय झालेले आहेत त्यांना 34 मते पडली तर पराभूत तुळशीराम बोबडे यांना 28 मते पडली. मानवत मतदार संघातून आकाश चोखट हे विजय झाले आहेत त्यांना वीस मते पडली तर पराभूत अमोल कदम यांना 15 मते पडली हिंगोली मतदारसंघातून राजा मती मुटकुळे ह्या विजय झाल्या असून त्यांना 59 मते मिळाली तर पराभूत गणेश शिंदे यांना 31 मते पडली वसमत मतदारसंघातून आमदार चंद्रकांत नवघरे विजय झाले आहेत त्यांना आठवण मते पडली तर पराभूत तुषार जाधव यांना 20 मते पडली कळमनुरी मतदार संघातून अभय सावंत विजय झाले असून त्यांना 35 मते पडली तर पराभूत बा ला साहेब मगर यांना 30 मते पडले झाली होती आमदार सईद खान विजय झाले असून त्यांना 290 मते पडली तर पराभूत विजय 287 मते पडली शोभा बोबडे या विजयी झाल्या असून त्यांना 1216 मते पडली तर पराभूत अतुल सरोदे यांना 176 मते मिळाली विमुक्त जमाती भटक्या जमाती विमाप्र गटातून दत्तात्रय मांय दळे हे विजयी झाले असून त्यांना 1066 मते पडली तर पराभूत सुरजसिंह परिहार यांना 348 मते पडली या संपूर्ण प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी एस पी काकडे यांनी निकाल घोषित करून मतमोजणी सुरळीत पार पाडण्यासाठी सहाय्यक निवडणूक अधिकारी बीएस नांदापूरकर लेखापरीक्षक राजेश देशमुख लोणीकर यांनी परिश्रम घेतले
मतमोजणी शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांचा चौक बंदोबस्त देण्यात करण्यात आला होता हर्ष उल्हास यामध्ये मोठा जल्लोषात गुलाल उधळत विजय साजरा केला.