header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मादणी येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती उत्साहात साजरी

अजींठा प्रतिनिधी सय्यद जमीरोद्दीन 

मादणी, दि. २३ जुलै २०२६ : जिल्हा परिषद  प्राथमिक शाळा मादणी, केंद्र शिवना येथे गुरुवार, दिनांक २३/०७/२०२६ रोजी भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे महानायक, राष्ट्रपुरुष आणि “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” हा प्रेरणादायी संदेश देणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून करण्यात आली. यावेळी शाळेतील शिक्षक श्री चोरमले सर, जिऊघाले सर, श्री पाटील सर, शकील सर, श्रीमती अवनकर मॅडम,श्रीमती पखन मॅडम,श्रीमती दांडगे मॅडम व विद्यार्थ्यांनी टिळकांच्या कार्याला आदरांजली वाहिली.

या प्रसंगी श्री. शकील अहमद सर यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवनकार्याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी टिळकांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, राष्ट्रीय शिक्षणाची संकल्पना, गणेशोत्सव व शिवजयंतीच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्य तसेच देशभक्ती, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक बांधिलकी याविषयी प्रेरणादायी माहिती दिली. विद्यार्थ्यांनीही कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90