header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

परभणीतील मुख्य रस्त्याच्या तीन तेरा. तरी प्रशासनाला जाग येईना.

नागरिक व व्यापाऱ्यांचा मनपा विरोधात संताप.

 पाकिजा  नगर ते रामजी आंबेडकर नगर मार्गाची दुरावस्था.

हिंदू प्रकाश वार्ता/ अशोक पवार.

परभणी कुठल्या ना कुठल्या कारणाने परभणी प्रकाश झोतात येत असते व काहीनाकाही जुगाड परभणी मध्ये घडतेच असंच परभणी शहरातील नवा मोंढा परिसरातीलकृषी उत्पन्न बाजार समिती कडे जाणारा तसेच पाकीजा नगर रामजी आंबेडकर नगर जिंतूर रोड आणि गव्हाणे चौक यांना जोडणारा मुख्य रस्ता सर्वांचाच डोकेदुखी ठरला आहे. सलग पडत असलेल्या पावसामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झाला असून ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यामध्ये पाणी साठले आहे त्या मुळे वाहनचालकाला व रस्त्यावर पादचाऱ्यांना चालताना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागते त्यामुळे पादचारी वर्गांची फार मोठी गैरसोय होत आहे. स्थानिक नागरिकाच्या म्हणण्यानुसार या रस्त्याचे गेल्या 10ते 12वर्षापासून पक्के रस्त्याची बांधणी करण्यात आलेली नाही प्रत्येक वेळेस माकडाच्या गोष्टी सारखे प्रशासनाला जाग येते व रस्त्या त्या थातूरमातूर डागडुजीला व आपल्या जवळच्या गुत्तेदाराला काम दिले जाते प्रत्येक पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होत आहे पक्का रस्ता बनण्याचे व कायमस्वरूपी रस्ता बनवण्याचे दुर्लक्ष होत आहे असा आरोप संतप्त नागरिकांतून केला जात आहे हा रस्ता जिल्हा परिषदे कडून कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जाणारा शहरातील मुख्य मार्ग असल्याने अनेक ग्रामीण भागातील शेतकरी व्यापारी माल वाहू वाहने तसेच ट्रक ट्रॅक्टर चार चाकी हातगाड्या आणि बैलगाड्यांचा दिवसभर वर्दळ असते रस्त्यावर पडलेले मोठे मोठे खड्डे आणि चिखलामुळे वाहतुकीचा वेग मंदावून अपघाताचा मोठा धोका वाढला आहे नागरिकांचे व्यापाराचे असे म्हणणे आहे की खराब रस्त्यामुळे ग्राहकांना ये जा करण्यासाठीखुप मोठी अडचण निरमान होत असून या मुळे व्यापाऱ्याचा व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे. परिसरातील रहिवासी्यांना या रस्त्याचा वापर करावा लागतो. मात्र पावसाल्यामुळे हा रस्ता पूर्णपणे चिखलमय झाल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे संबंधित लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिका प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घ्यावी त्वरित पक्क्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करून किंवा डांबरीकरण करून कायमस्वरूपी रस्त्याचा तोडगा काढावा अशी मागणी व सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे. शहरातील महत्वाच्या मार्गा पैकी एक असलेला या रस्त्याची एवढी दुरावस्था झाल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाकडून कोणतीही रोज कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होत असून पावसाळा संपन्याची वाट न बघता तातडीने रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90