हिंदू प्रकाशवार्ता/प्रतिनिधी
सोयगाव,दि.२४ जुलै
जिल्हा परिषद प्रशाला सोयगाव येथे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एन.एन.एम.एस.)परीक्षा गुणवंत विद्यार्थी व इस्त्रो सहल निवड झालेले विद्यार्थी वैष्णवी कडुबा ढगे,देवयानी गोपाल आवटे,नेहा शिवदास आस्वार,अक्षरा परशुराम पंडित,पालक भागवत गायकवाड,देवयानी निलेश मिसाळ,तेजस समाधान भोकरे,गायत्री भगवान बावस्कर,पूजा शिवाजी बावस्कर,प्रांजली राजेंद्र खलसे,वृषाली गोपाल साळुंके,पार्थ समाधान इंगळे या विद्यार्थ्यांचा व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक भास्कर चौधरी,सचिन ढगे,संगीता सोनवणे, शाळेचे मुख्याध्यापक दादाराव राठोड यांचा जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई काळे यांचे मार्गदर्शनातून व तेजस्विनी काळे यांचे संकल्पनेतून स्वातंत्र्य सेनानी बाबुरावजी काळे गुणवत्ता पुरस्कार देऊन या विद्यार्थ्यांना व गुरुजनांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष पुष्पाताई काळे होत्या तर प्रमुख अतिथी सभापती उत्तम चव्हाण,गोंदेगाव गट जिल्हा परिषद सदस्य सुनीताताई चव्हाण यांचे पती शेखर चव्हाण,पंचायत समिती सदस्य जयश्री पवार याचे पती गजानन पवार सामाजिक कार्यक्रम संकल्पक तेजस्विनी काळे,सामाजिक कार्यकर्ते संजय शहापूरकर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील ठोंबरे,उपाध्यक्ष भारती भागवत गायकवाड,सदस्य वाल्मीक चव्हाण व सर्व पदाधिकारी,माजी विद्यार्थी संघाचे प्रा.निलेश गाडेकर व पदाधिकारी,खरेदी विक्री संघाचे संचालक मयूर मनगटे,शिक्षण प्रेमी अरुण सोहनी,विजय गव्हाड,गटशिक्षणाधिकारी यांचे तर्फे केंद्र प्रमुख फिरोज तडवी,मुख्याध्यापक जंगलातांडा रामदास फुसे,केंद्र शाळा किरणकुमार पाटील,गोपाल चौधरी,दीपक बावस्कर , गजानन ताडे,दिलीप इंगळे,गजानन मख,नितेश गवादे यांचे सह शिक्षक मित्र परिवार उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांचा स्वागतपर सत्कार प्रशालेचे वतीने मुख्याध्यापक व शिक्षक यांनी केला.
याप्रसंगी बोलताना पुष्पाताई काळे यांनी विद्यार्थी व शिक्षक यांचे कौतुक करून अभिनंदन केले,व भविष्यात उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या,शाळेच्या सर्व अडचणी सोडविण्यासाठी शाळेचे पालकत्व स्वीकारून काम करणार आहोत असे आश्वासन दिले.यावेळी मान्यवरांची समायोचीत भाषणे पार पडली.सूत्र संचलन दौलतसिंग परदेशी आभार भास्कर चौधरी यांनी मानले.
कार्यक्रम यशस्विते साठी शाळेचे मुख्याध्यापक दादाराव राठोड यांच्या सह सर्व शिक्षक शिवाजी नवले,विद्याधर बागुल,राजेंद्र उंबरकर,संगीता सोनवणे,जया वाघ,तुकाराम पायघन,सचिन ढगे,शिवराम आगे,संतोष भारद्वाज,सागर पडघम,कर्मचारी प्रवीण चावळे यांनी परिश्रम घेतले