हिंदू प्रकाश वार्ता प्रतिनिधि परभणी
दरवर्षी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला जुलै ऑगस्ट महिन्यात बोर्ड पुढील वर्षीच्या फेब्रुवारी मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करीत असते. त्यामुळे यंदा बोर्डाच्या संभाव्य वेळापत्रकात दहावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकातील प्रथम भाषा मराठी विषयाच्या पेपरचा क्रम बदलायला हवा. त्यामुळे नक्कीच प्रथम भाषा मराठी विषयाचा निकाल वाढण्यात आणि एकूणच उत्तीर्णाची संख्या वाढण्यात मदत होईल.
यंदा महाराष्ट्र राज्य मंडळाच्या दहावी बोर्ड परीक्षेत मराठी विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. या.वर्षी फेब्रुवारी मार्च 2026 मध्ये झालेल्या दहावी बोर्ड परीक्षेत प्रथम भाषा मराठी असलेल्या आणि प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या दहा लाख 87 हजार 699 इतकी होती. तर पास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या दहा लाख सहा हजार 896 इतकी आहे. मराठी माध्यमाच्या शाळेत.80. हजार 803 विद्यार्थी नापास झाले आहे तर इतर म्हणजेच इंग्रजी. उर्दू आदी माध्यमांत शिक्षण घेणारे व ज्या विद्यार्थ्यांनी दृतीय किंवा तृतीय भाषा म्हणून मराठी घेतला आहे ते.13. हजार 741 विद्यार्थी मराठी विषयात नापास झाले आहेत. असे दोन्ही मिळून एकूण 94 हजार 544 विद्यार्थी मराठी विषयात नापास झाले आहेत.
वरील.80. हजार 803. विद्यार्थी हे मराठी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेणारे व प्रथम भाषा मराठी विषय असणारे विद्यार्थी आहेत. प्रथम भाषा मराठी विषयात इतक्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी का नापास झाले.?. याची वेगवेगळी कारणे आहेत. सरकार शिक्षण संस्था. शिक्षक. मराठी भाषाप्रेमी मंडळी यावर चिंतन करीत असून त्यातून नक्कीच काही सकारात्मक बदल अपेक्षित आहेत.
इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेतील मराठी विषयाचा निकाल उंचावण्यासाठी काही उपाय सहज करता येणे शक्य आहे. ते काळजीपूर्वक व वेळेत करायला हवेत.
मुले मराठी नापास का झाली याची अनेक कारणे असली तरी एक महत्त्वाचे कारण असे की दहावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात दरवर्षी प्रथम भाषा मराठी विषयाचा पेपर पहिला असतो. विद्यार्थ्यांवर बोर्डाच्या परीक्षेचे दडपण संपूर्ण वर्षभर असते. परीक्षा जसजशी जवळ येते तस तसा विद्यार्थ्यांवरील अभ्यास व परीक्षेचा ताण वाढत जातो. त्यात दहावी बोर्ड परीक्षेचे बहुतांश वेळा परीक्षा केंद्र दुसऱ्या शाळेत असते. आजोबांच्या शाळांची मुले ही परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी एकत्र असतात. केंद्राबाहेर पोलीस. सीसीटीव्ही कॅमेरे. परीक्षा केंद्रात प्रवेश करताना होणारी तपासणी. परीक्षा केंद्रावरील विद्यार्थी व शिक्षकांचे अनोळखी चेहरे हे सर्व दहावीच्या परीक्षेत पहिल्या पेपरच्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी नवीन असते. किंबहुना तो त्यांचा पहिलाच अनुभव असतो. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष या सर्वांचा तान विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर जाणवत असतो. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या प्रथम भाषा मराठी विषयाच्या पेपर लेखनावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मराठी विषयात नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही इतर विषयांच्या तुलनेत अधिक असते. दहावी प्रमाणे बारावी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक आणि निकालाचा संबंध आहे. बारावी परीक्षेत पहिला पेपर हा इंग्रजी विषयाचा असतो आणि बारावी परीक्षेत इंग्रजी विषयातच अनुत्तीर्णाची संख्या अधिक असते.
त्यामुळे राज्य मंडळांनी पहिल्याच दिवशी प्रथम भाषा मराठी विषयाचा पेपर ठेवण्याऐवजी दरवर्षीप्रमाणे वेगवेगळे विषय पहिल्या दिवशी ठेवायला हवेत. गणित. विज्ञान आणि सामाजिक शास्त्र. या विषयांचे प्रत्येकी दोन पेपर हे 40 गुणांसाठी असतात. यापैकी कोणताही पेपर पहिल्या दिवशी ठेवायला हवा. हा प्रयोग करणे बोर्डाला सहज शक्य आहे. यामुळे मराठी विषयाचा निकाल वाढण्यास काही प्रमाणात मदत होईल. गेल्या चार वर्षातील सीबीएसई बोर्डाच्या दहावी परीक्षेच्या वेळापत्रकाचा अभ्यास केला तर असे लक्षात आले की सीबीएसई दरवर्षी दहावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात वेगवेगळा विषय पहिल्या दिवशी ठेवते. मार्च 2023 च्या परीक्षेत सीबीएसई बोर्डाने वैकल्पिक पेंटिंगसारखे विषय परीक्षेत पहिल्या दिवशी ठेवले होते. तर मार्च 2024 मध्येही वैकल्पिक विषयच बोर्डाने आधी ठेवले होते. फेब्रुवारी 2025 परीक्षेत इंग्रजी आणि फेब्रुवारी 2020 च्या परीक्षेत गणित विषयाची परीक्षा पहिल्या दिवशी घेण्यात आली. त्यामुळे राज्य मंडळांनीही आपल्या दहावी बोर्ड वेळापत्रकात लवचिकता आणि नाविन्यता आणायला हवी. जगप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ जॉन अमोस कोमेनियस याचे अध्यापन शास्त्राचे सोप्याकडून कठीणाकडे हे सूत्र राज्य मंडळांने परीक्षेचे वेळापत्रक निश्चित करताना विचारात घ्यायला हवे….