header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह माणगाव येथे वर्षावास मालिकेचा प्रारंभ मोठ्या उत्साहात संपन्न

विश्वास गायकवाड बोरघर, माणगांव रायगड*

 बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा माणगाव आणि शाखा क्रमांक एक आयोजित वर्षावास धम्म प्रवचन मालिकेच्या प्रारंभ अर्थात पहिला दिवस या दिवशी तिसऱ्या पर्वाच्या वर्षावास धम्म प्रवचन मालिका सोहळ्याची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह माणगाव येथे बुधवार दिनांक २९ जुलै २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा माणगाव चे विद्यमान अध्यक्ष मा. रविंद्र मोरे यांच्या अध्यक्षतेखाली उपाध्यक्ष मा. नामदेव राव, सचिव मा. रघुनाथ साळवी, सह सचिव मा. रणजित मोहिते, कोषाध्यक्ष मा. सुरेंद्र जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि तालुक्यातील सर्व उपविभागीय एक ते अकरा शाखांचे आजी माजी पदाधिकारी, सभासद, धम्म उपासक, धम्म उपासिका यांच्या मोठ्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह माणगाव येथे मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला.

        या मंगलमय वर्षावास धम्म प्रवचन मालिका सोहळ्याचे उदघाटण मा. पराग जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. या शानदार वर्षावास धम्म प्रवचन सोहळ्याची सुरुवात प्रांगणात बोधी वृक्ष रोपण करून त्या नंतर मान्यवरांच्या हस्ते आदर्शांच्या प्रतिमांना पुष्प आणि पुष्प माला अर्पण करून अगरबत्ती, मेणबत्ती प्रज्वलित करून. बुद्ध वंदना, त्रिशरण आणि पंचशीलाचे सामूहिक पठण करून करण्यात आली.

       सदर वर्षावास धम्म प्रवचन मालिका सोहळ्याचे सूत्रसंचालन बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा माणगाव चे विद्यमान सचिव मा. रघुनाथ जी साळवी यांनी केले. आणि या शानदार सोहळ्याचे सुनियोन आणि व्यवस्थापन बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा माणगाव चे विद्यमान दुय्यम सचिव मा. रणजित मोहिते आणि कोषाध्यक्ष मा. सुरेंद्र जाधव आणि शाखा क्रमांक एक चे अध्यक्ष मा. प्रशांत गायकवाड आणि त्यांचे सहकारी यांनी केले. सदर सोहळा तालुका शाखा आणि शाखा क्रमांक एक च्या यजमान नेतृत्वाखाली संपन्न झाला.

     या मंगलमय वर्षावास धम्म प्रवचन मालिका सोहळ्याचे संपूर्ण चित्रीकरण, प्रचार प्रसार आणि सर्वदूर प्रसिद्धी देण्याचं काम पत्रकार उत्तम तांबे, पत्रकार गौतम जाधव आणि पत्रकार विश्वास गायकवाड तालुका प्रसिद्धी प्रमुख म्हणून प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारण केले.

      या वर्षावास धम्म प्रवचन मालिका सोहळ्यात उपस्थित सर्व आजी माजी पदाधिकारी यांचे शाखेच्या वतीने शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तदनंतर सत्कारमूर्ती मा. पराग जाधव, मा. विनोद मोरे, मा . राजकुमार मोरे, मा. मालिनी कांबळे, मा. भिमराज मोरे, मा. अरुण मोरे, मा. अनिल मोरे, मा. योगेंद्र साळवी इत्यादीं सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांचा शाखेच्या माध्यमातून शाल , सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार  करण्यात आला. वर्षावास धम्म प्रवचन मालिकेच्या पहिल्या दिवशी आषाढ पौर्णिमा आणि वर्षावासाचे महत्व या विषयावर प्रवचनकार मा. कुंदा राजन खरात मॅडम यांनी उपस्थित असंख्य उपासक आणि उपासिका यांना भगवान बुद्धांचा जन्म, बालपण, शाक्य आणि कोलिय संघर्ष,गृहत्याग, तपस्या, ज्ञान प्राप्त, उपदेश,धम्म चक्र प्रवर्तन, वर्षावास इत्यादी विषयांवर धम्म प्रवचन देऊन संबोधित केले.

       सदर मंगलमय सोहळ्याला बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा माणगाव चे सर्व पदाधिकारी शाखा क्रमांक १) चे अध्यक्ष प्रशांत गायकवाड, उपाध्यक्ष दयाराम साळवी, सचिव  विनोद मोरे, सह सचिव प्रकाश मोरे, शाखा क्रमांक २) निजामपूर विभाग अध्यक्ष रवींद्र गायकवाड, शाखा क्रमांक ३) कडापे विभाग अध्यक्ष सुनील उभारे, शाखा क्रमांक ४) इंदापूर विभाग माजी उपाध्यक्ष प्रकाश कांसे, शाखा क्रमांक ५) खरवली विभाग अध्यक्ष विवेक जाधव, उपाध्यक्ष राजेश कासारे, सह सचिव नंदू कांबळे,ऑडिटर संतोष मोरे, शाखा क्रमांक ६) माणगाव शहर शाखा  अध्यक्ष निलेश साळवी, उपाध्यक्ष महेंद्र पवार, माजी सचिव रमेश लोखंडे, शाखा क्रमांक ७) साई विभाग अध्यक्ष संदेश जाधव, सह सचिव मंगेश मोरे , शाखा क्रमांक ८) मोर्बा विभाग अध्यक्ष संदेश साळवी, प्रदीप हाटे,भाऊ ओव्हाळ, निलेश साळवी, शाखा क्रमांक ९) गोवेले विभाग अध्यक्ष धनवेश साळवी, रमेश शिंदे , मनोहर शिंदे, संदेश शिंदे, अरुण मोरे, शाखा क्रमांक १०) वडवली विभाग सह खजिनदार संजय जाधव, उपाध्यक्ष यशवंत शिर्के, सचिव सिद्धार्थ मोरे, बामसेफ आणि बीन चे प्रवक्ते सुर्यकांत कासे सर,आणि माणगाव तालुका शाखेच्या सर्व उप विभागीय शाखांचे सर्व आजी माजी सन्माननीय पदाधिकारी आणि सर्व सन्माननीय सभासद आबालवृद्ध धम्म बांधव, भगिनी शुभ्र वस्त्र परिधान करून मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. या कार्यक्रमासाठी सत्कारमूर्ती माजी तालुका सचिव मा. पराग जाधव यांनी भोजन दान दिले. भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90