header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

शासकीय रेशनच्या धान्याचा तांदळाचा काळाबाजार.पन्नास हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल जप्त

https://hinduprakashwarta.com/wp-content/uploads/2026/06/1001401265.png

एकीकडे राशन दुकानदार एक किलो धान्य जास्त देत नाही उलट त्यांचं पाच ते सहा किलो राशन कमी करून देतो आणि एवढाच मालवरून आला असल्याचे सांगत असतो चोरी केलेला माल हा काळा बाजारात विकल्या जातो असाच एक प्रकार हद्दीत करून काळा बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवलेल्या मालावर कारवाई करत तांदळाचा. मोठा साठा जप्त केला आहे . 49 तांदूळ पंचवीस क्विंटल 35 किलो 50 हजार 700 रुपये किमतीचा मुद्देमाल. पोलिसांनी ताब्यात घेण्यात आला मिळालेल्या अधिक माहितीनुसार नवा मोंढा येथील व्यापारी अमोल रमेश राठी वय 28 वर्ष राहणार प्रसावतनगर त्यांच्या श्रेया ट्रेडिंग कंपनी शासकीय राष्ट्रांचा अवैधरीत्या साठवून ठेवला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून तपासणी केली असता दुकानांमध्ये 49 कट्टे.तांदूळ सापडला. सदरील तांदूळ काळ्या बाजारात विक्री करण्याचा उद्देशाने साठवून ठेवण्यात आल्याचा संशय पोलिसांना आला असून पुढील कायदेशीर कारवाई साठी जप्त करण्यात आलेला मोजमाल कोतवाली पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे सदरील ची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक गजेंद्र सरदे यांच्या मार्गदर्शकांनी करण्यात आली कारवाई पोलीस उपनिरीक्षक परिहार पोलीस हवालदार रंजीत आगळे रवी जाधव सूर्यकांत फड बुकरे काळे पोलीस कॉन्स्टेबल निलेश परसोडे दीपक मंदिराज यांनी सहभाग घेतला जिल्ह्यात शासकीय धान्याचा काळाबाजार पोलीस व पुरवठा विभागाकडून सातत्याने विशेष मोहीम राबविण्यात येत असून अशा प्रकारच्या गैरव्यवहारावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे या कारवाईमध्ये राशन धान्याचा अवैधसाठे बाजी व काळाबाजार करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून पोलीस ठाण्याच्या बाजूलाच अवैध काळा बाजारात विकले जाणारा माल सापडल्यामुळे चर्चा ला उधाण आले.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90