header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

मी पंढरपूरचा डॉन…” म्हणत गोळीबार करणाऱ्या जुबेर पठाणला बेड्या; घटनास्थळी आणून पंचनामा, हर्सूल कारागृहात रवानगी

https://hinduprakashwarta.com/wp-content/uploads/2026/06/IMG-20260623-WA0009.jpg

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) 

वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंढरपूर परिसरात “मला पंढरपूरचा डॉन म्हणतात” अशी डरकाळी फोडत हवेत गोळीबार करणाऱ्या आणि नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या जुबेर पठाण याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. मंगळवारी (दि. २३ जून) पोलिसांनी आरोपीला घटनास्थळी आणून संपूर्ण गुन्ह्याचा पंचनामा केला. न्यायालयाने आरोपीची रवानगी हर्सूल मध्यवर्ती कारागृहात केली आहे.​घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिसांनी तातडीने धाव घेत तपास सुरू केला. फिर्यादी जावेद शेख यांनी गोळीबाराच्या कारतूसाचे कवच पोलिसांच्या स्वाधीन केले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि आरोपी जुबेर पठाण याला बेड्या ठोकल्या.​न्यायालयाने आरोपीला २३ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. या कोठडीदरम्यान पोलिसांनी आरोपीकडून गोळीबारात वापरलेली पिस्टल आणि गुन्ह्यातील दुचाकी जप्त केली आहे. ​पोलीस कोठडीची मुदत संपल्याने जुबेर पठाण याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपीची न्यायालयीन कोठडीत (MCR) रवानगी केली. त्यानुसार त्याची हर्सूल मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वाळूज एमआयडीसी पोलीस अत्यंत गांभीर्याने करत आहेत.

चौकट 

नेमकं काय घडलं होतं?

​२० जून रोजी पंढरपूर येथील रांजणगाव रोड परिसरात जावेद शेख आणि आरोपी जुबेर पठाण यांच्यात किरकोळ कारणावरून जोरदार वाद झाला होता. या वादाचे पर्यावसान आदळआपटीत झाले आणि जुबेर पठाण याने स्वतःजवळील पिस्टलमधून थेट हवेत गोळीबार केला. एवढेच नव्हे तर, “मी पंढरपूरचा डॉन आहे” असे म्हणत त्याने जावेद शेख यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे परिसरात प्रचंड घबराट पसरली होती.

घटनास्थळी क्राईम सीन री-क्रिएशन; नागरिकांची गर्दी

​तपासाचा भाग म्हणून मंगळवारी पोलिसांनी आरोपी जुबेर पठाण याला कडक बंदोबस्तात थेट पंढरपूर येथील रांजणगाव रोडवर आणले. गोळीबार नेमका कसा केला, याचा संपूर्ण घटनाक्रम पोलिसांनी री-क्रिएट (पुनर्रचना) करून सविस्तर पंचनामा केला. यावेळी ‘डॉन’ची पोलिसांसमोर झालेली अवस्था पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90