header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

पतंजलीच्या वतीने जिंतूर येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

जिंतूर, दि. 29 जुलै : पतंजली योगपीठ, हरिद्वार यांच्या निर्देशानुसार जिंतूर येथे गुरुपौर्णिमानिमित्त योगसाधना, वैदिक यज्ञ आणि गुरु महिमा याविषयी प्रबोधनपर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

        सकाळी 5.30 ते 7.00 या वेळेत नियमित योगवर्गाचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर वरुड रोडवरील साई सृष्टी गार्डन येथे सकाळी 7.00 ते 8.30 या वेळेत वैदिक पद्धतीने यज्ञ करण्यात आला. यज्ञामध्ये अनेक साधकांनी सहभागी होत वातावरण भक्तिमय केले.

      या कार्यक्रमात भारत स्वाभिमान न्यासचे जिल्हा प्रभारी धोंडीराम शेप यांनी गुरूंचे जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित केले. जीवनाला योग्य दिशा, ज्ञान, संस्कार आणि मूल्यांची जाणीव करून देण्याचे कार्य गुरू करतात. गुरूंच्या ऋणाची जाणीव ठेवून त्यांचे स्मरण करण्यासाठी गुरुपौर्णिमा हा अत्यंत पवित्र दिवस असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यज्ञाचे वैज्ञानिक महत्त्व स्पष्ट करताना तूप व औषधी वनस्पतींच्या आहुतीमुळे वातावरण शुद्ध होण्यास मदत होते आणि अनेक आजारांपासून संरक्षण मिळण्यास सहाय्य होते, असे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाचे यजमान म्हणून श्री. पुरुषोत्तम अंभुरे व सौ. अंभुरे तसेच श्री. प्रकाश घुगे व सौ. घुगे यांनी जबाबदारी पार पाडली.

        यावेळी भारत स्वाभिमानचे जिल्हा कोषाध्यक्ष वसंतराव देशमुख, पतंजली किसान सेवा समितीचे तहसील प्रभारी लखूजी जाधव, सोशल मीडिया तहसील प्रभारी सचिन रायपात्रीवार, संरक्षक सदस्य हरिभाऊ केंद्रे, युवा भारतचे सहप्रभारी संतोष आंधळे तसेच गेल्या साडेचार वर्षांपासून नियमित सुरू असलेल्या स्थायी योगवर्गाचे सदस्य विश्वनाथ बोरुंडे, रवी आढे, ज्ञानेश्वरजी, दिलीपराव राठोड, चव्हाणजी, दत्ताभाऊ तळेकर, गजाननजी, विष्णु जाधव, किशनराव वाटाणे, अश्विन सोनवणे आणि अन्य साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       या कार्यक्रमाचा समारोप शांतिपाठाने करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमात गुरुभक्ती, योगसाधना आणि भारतीय संस्कृतीचा जागर जागर प्रसार करण्याचा संदेश देण्यात आला.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90