header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

गंगाखेड नगरपरिषदेत कोट्यावधीचा भ्रष्टाचाराचा घोटाळा.

 बेकायदा पद भरती सह. नपची 20 कोटीची जागा दगडू बाई गुठे प्रतिष्ठानला.

 गंगाखेड नगर परिषदेच्या प्रशासकीय कालावधीत बेकायदेशीर पदभरतीसह शहरातील सर्वे नंबर 251 मधील अंदाजित रक्कम पंधरा ते वीस कोटी ची 4800 स्क्वेअर फुट जागा शासनाच्या हस्तांतरणाची परवानगी न घेताच तात्कालीन प्रशासकीय अधिकारी जीवराज डापकर सीईओ जयवंत सोनवणे यांनी दगडूबाई प्रतिष्ठानला कोणत्या नियमात जागा दिली तसेच घनकचरा व्यवस्थांपणात झालेल्या भ्रष्टाचाराची खोल खोल राष्ट्रवादीचे गट नेते मिथिलेश केंद्रे यांनी पत्रकार परिषदेत केल्याने नगर परिषदेत भ्रष्टाचाराचा स्फोटझाल्याचे चित्र स्पष्ट झालेआहे.

 राष्ट्रवादी कार्यालयासमोर आज शुक्रवार रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे गटनेते नितिलेश केंद्रे नगरसेवक सुनील चौधरी खंदारे प्रवीण घोबाळे प्रमोद मस्के रणधीर राजे भालेराव मान्यवर उपस्थित होते यावेळी मिथिलेश केंद्रे यांनी यशवंत सेनेच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषद केलेल्या आरोपाचा पुरावे  निशी उत्तर दिले .

 नगरपरिषद आजपर्यंत तीन सर्वसाधारण सभा घेण्यात आल्या 15 एप्रिल रोजी सीईओ यांना पत्र देत सर्वसाधारण सभा घेण्यात बाबत सुचविले असता दिनांक 21 एप्रिल रोजी सर्व नगरसेवकांना पत्र देत प्रभागातील मूलभूत समस्या अडचणी यासंदर्भात लेखी समस्या चे निवेदन देण्या बाबत सुचविले असता यशवंत सेनेचे सौं साळवे व यानपाल्लेवर यांनी लेखी समस्या चे निवेदन देण्यात आले व गटनेते एड अकबर यांनी पंतप्रधान आवास योजनेचा सन2019 ते 2026 पर्यंत पात्र लाभार्थी ना देण्यात आलेल्या अनुदानाच्या संचिकेच्या

 प्रतीची मागणी केली. या सर्व बाबी सर्वसाधारण सभेत येता येतात का? प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला. नगरपरिषदेतील घनकचरा व्यवस्थापनामध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार प्रशासकीय काळात करण्यात आला नागराल प्रायव्हेट कंपनीत एका वर्षासाठी दिलेल्या ठेका  नियमबाहय तीन वर्षे चालवण्यात आला या नागराज कंपनीस अकरा लाख ते बारा लाखाची बिल प्रतिमाह काढण्यात आले. एस आय यांनी नियमबाह्य केले एस आय यांना एमबी रेकॉर्ड करण्याचा अधिकारच नाही तर नागराल कंपनीचे काम संपण्यापूर्वीच आठ लाखाची अनामत रक्कम परत कोणत्या नियमात केली याबाबत तसेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे लोककल्याण निधी हा आरोग्य पर्यावरण पर्यटन साठी असून तो इतरत्र वापरता येत नसताना या निधीतून प्रभागात सोलार पथदिव्यसह इतर कामाचा प्रस्ताव देण्यात आला शासकीय काळात अनेक बेकायदेशीर निर्णय घेण्यात आले गंगाखेड नगरपरिषद आर्थिक व्यवहारांमध्ये जनतेचे कर रोपाने जमा झालेले पैशाचे उधळ पट्टी करण्यात आली काही निवडक व्यक्ती आणि हित संबंध गटांना लाभ मिळावा यासाठी नियमांना बगल देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला अस्तित्वातनसलेल्या बनावट आवक-जावट 1932 क्रमांक वापर करून पाच ते सात जणांची नोकर भरती करण्यात आल्याचा दावा करीत संबंधित भरती प्रक्रियेत प्रशासकाने कागदपत्रांमध्ये फेरफार करून नियमबाह्य नियुक्त्या  दिल्याचा आरोप करण्यात आला या भरती प्रक्रियेत सखोल चौकशी झाल्याचा अनेक धक्कादायक बाबी समोर येतील असा दावा  मिथिलेश केंद्रे यांनी केलानगर परिषदेत प्रशासकीय राजवटीच्या काळात अनेक अनेक विकास कामे खरेदी प्रक्रिया कंत्राटे व कर्मचारी नियुक्तीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरविवार झाला आहे या प्रकरणातील संबंधित कागदपत्राची चौकशी करून दोषीवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची गरज असल्याचे गटनेते केंद्रे यांनी स्पष्ट केल्याने शहरातील राजकीय प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे   आवक-जावक नोंदीमध्ये फेरफार करून नियुक्तया देण्यात आले असतील तर नगरपरिषद इतर आर्थिक व्यवहारांमध्ये अशाच प्रकारच्या  अनियमित्ताझाल्याने सखोल निपक्ष चौकशी होणे गरजेचे आहे प्रशासकीय काळात आणखी किती गैरव्येवहार झाले याचा कोणा कोणाला लाभ मिळाला याची नावे जाहीर होणे ही काळाची गरज आहे अशी जोरदार चर्चा सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90