मिळालेल्या माहितीनुसार, 22 वर्षीय महाविद्यालयीन तरुणाविरुद्ध काही दिवसांपूर्वी एका तरुणीने मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र, नंतर दोघांमध्ये समझोता होऊन वाद मिटला होता. असे असतानाही संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी तरुणावर गुन्हा दाखल करण्याची धमकी देत 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.
तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. लाचेच्या मागणीतील पहिला हप्ता म्हणून 10 हजार रुपये स्वीकारताना एसीबीच्या पथकाने दोघांना रंगेहाथ पकडले.
या प्रकरणी पुढील कारवाई सुरू असून, पोलीस दलातील भ्रष्टाचाराचा आणखी एक प्रकार समोर आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
