header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

गोदावरी पात्रात अवैध वाळू उपसा पोलिसांचा छापा चाळीस लाख 49 हजाराचा मुद्देमाल जप्त.

https://hinduprakashwarta.com/wp-content/uploads/2026/06/sand-mining.png.webp

हिंदू प्रकाश वार्ता परभणी प्रतिनिधी.

 तालुक्यातील पिंपरी( झोला) व नागठाणा शिवारातील गोदावरी नदीत पात्रात अग्रद वाळू उपसा करणाऱ्या विरुद्ध शनिवार दिनांक 6 जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाई तीन ट्रॅक्टर एक जेसीबी व वाळूसाठा जप्त करून आठ जनाविरोधात गुन्हा दाखल  केल्याने वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे

 याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की स्थानिक गणेश शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली  शनिवार  दिनांक ६ जून रोजी पोलीस उपनिरीक्षक चंदनसिंग परिहार पोलीस हवालदार महेश कोठारे पोलीस हवालदार राहुल परसोडे पोलीस हवालदार माणिक वाघ पोलीस हवालदार रंगनाथ दुधाटे पोलीस हवालदार सचिन भदर्गे पोलीस शिपाई शरद सावंत पोलीस शिपाई दिलीप निलपत्रेवार पोलीस शिपाई हनुमान ढगे चालक पोलीस हवालदार उत्तमराव हनवते आदींचे पथक अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दत्त मंदिर परिसरातील गस्तीवर असताना पोलीस शिपाई भारत पवार पोलीस शिपाई पवन राऊत यांना भेटले त्यावेळी पिंपरी (झोला) नागठाणा शिवारात गोदावरी पात्रात जेसीबी ट्रॅक्टरच्या साह्याने अभिद्रित्या वाळू उपसा सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्या वरून पथकाने शनिवार दिनांक 6 जून रोजी सकाळी दहा वाजून 45 पिंपरी झोला नागठाणा शिवारातील गोदावरी नदीत पात्र छापा मारला असता एमएच २९बीसी 94 97 क्रमांकाचा एक जेसीबी मशीन तीन ट्रॅक्टर मध्ये वाळू भरताना दिसून आली पोलिसांचे पथक गोदावरी नदी पात्रात येत असल्याने पाहून या वाहनचालकाने वाहने जागी सोडून पळ काढला पथकाने पाणी केले असता नदी काठावर अंदाजे चाळीस ब्रास पेक्षा जास्त अधिक वाळू साठा केलेला दिसून आल्याने तहसीलदार उषा किरण शृंगारे यांनी माहिती देत मंडळ अधिकारी चंद्रकांत साळवे यांच्यामार्फत वाळू साठ्याचा पंचनामा करून पिंपरी झोला येथील पोलीस पाटील यांच्या ताब्यात वाळूसाठा देऊन वाढवणे भरलेले दोन  ट्रॅक्टर  सह  रिकाम ऐकतात असे तीन ट्रॅक्टर व एक जेसीबी मशीन असा एकूण 40 लाख 49 हजार रुपयांचा मुद्देमाल गंगाखेड पोलीस ठाण्यात आणून पोलीस हवालदार माणिक वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तीन ट्रॅक्टरचे चालक-मालक जेसीबी चालक-मालक अशा एकूण आठ जनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल लोखंडे करीत आहेत

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90