header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

पोलीस भरतीचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यावर भारत करिअरअकॅडमीत बेल्ट-काठीने मारहाण! छत्रपती संभाजीनगर हादरले

https://hinduprakashwarta.com/wp-content/uploads/2026/06/academy.jpeg

पोलीस दलात भरती होऊन देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थ्यावरच प्रशिक्षण केंद्रात अमानुष अत्याचार झाल्याची संतापजनक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडकीस आली आहे. शिस्तीच्या नावाखाली विद्यार्थ्याला बेल्ट आणि काठीने बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप असून, या धक्कादायक प्रकारामुळे पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

शहरातील भारत करिअर अकॅडमीत घडलेल्या या घटनेत संबंधित पी.टी. प्रशिक्षक व व्यवस्थापक विवेक डाकणे यांनी किरकोळ कारणावरून अल्पवयीन विद्यार्थ्याला लक्ष्य केल्याचा आरोप आहे. विद्यार्थ्याला वारंवार मारहाण करत त्याचा मानसिक छळही करण्यात आल्याचे समोर आले आहे. या मारहाणीत विद्यार्थ्याला दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे.

या संपूर्ण प्रकाराला आणखी गंभीर वळण देणारी बाब म्हणजे मारहाणीचे दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले आहे. फुटेजमध्ये विद्यार्थ्याला मारहाण होत असल्याचे स्पष्ट दिसत असल्याची माहिती समोर येताच खळबळ उडाली. पोलिसांनी हे फुटेज ताब्यात घेतले असून तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत. घटनेनंतर विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी छावणी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. शारीरिक अत्याचारासोबतच रॅगिंगसदृश वागणुकीतून मानसिक छळ केल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी संबंधित प्रशिक्षक आणि व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांना घडविण्याचा दावा करणाऱ्या प्रशिक्षण संस्थांमध्ये असे प्रकार घडत असतील तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कोण घेणार, असा सवाल आता उपस्थित होत आहे. सीसीटीव्हीतील दृश्यांमुळे प्रकरणाची गंभीरता वाढली असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. छावणी पोलीसानी गुन्हा दाखल केला असून उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90